TRENDING:

लोकांनी नावं ठेवली,आता तुमची वेळ आली! धनत्रयोदशीत चंद्राचे महागोचर, या राशींकडे अफाट पैसा येणार

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांचे संक्रमण आणि त्यांच्या राशीतील बदलांचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो.
advertisement
1/5
तुमची वेळ आलीच! धनत्रयोदशीत चंद्राचे महागोचर, या राशींकडे अफाट पैसा येणार
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांचे संक्रमण आणि त्यांच्या राशीतील बदलांचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. प्रत्येक ग्रहाचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर भिन्न प्रकारे जाणवतो. त्यातही चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. तो सुमारे अडीच दिवस एका राशीत थांबतो आणि नंतर पुढील राशीत प्रवेश करतो. त्यामुळे चंद्राच्या हालचालींमुळे वारंवार विविध ग्रहांशी त्याची युती होते, जी काही राशींसाठी अत्यंत शुभ तर काहींसाठी थोडी प्रतिकूल ठरते.
advertisement
2/5
पंचांगानुसार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी (आज) रात्री १० वाजून ११ मिनिटांनी चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. योगायोगाने आजच धनत्रयोदशी देखील आहे. त्यामुळे हा दुहेरी योग धनत्रयोदशीचा दिवस आणि चंद्राचा कन्या राशीतील गोचर काही राशींसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. चला पाहूया कोणत्या राशींवर या चंद्र गोचराचा विशेष शुभ प्रभाव पडणार आहे.
advertisement
3/5
<strong>सिंह राशी - </strong>  सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत आनंदी आणि सकारात्मक ठरणार आहे. दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. आत्मविश्वासात मोठी वाढ जाणवेल. सामाजिक सन्मान मिळेल, तसेच प्रतिष्ठेत वाढ होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील आणि मानसिक तणावातून सुटका होईल. कुटुंबात शुभकार्याचे वातावरण निर्माण होईल. परदेशप्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक जीवनात समाधान आणि आनंद मिळेल. एकूणच, सिंह राशींसाठी हा कालावधी सौख्यदायी आणि यशस्वी राहील.
advertisement
4/5
कन्या राशी -   कन्या राशीसाठी चंद्राचे हे गोचर आणि धनत्रयोदशीचा योग अत्यंत लाभदायक आहे. आर्थिक स्थितीत वाढ होईल आणि अचानक धनलाभाचे योग तयार होतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल, तर नवीन संधीही मिळतील. व्यवसायात चांगली प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यशाचे गोड फळ मिळेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण वाढतील. या काळात प्रवासाचे योगही आहेत. मेहनतीला उत्तम यश मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल.
advertisement
5/5
कर्क राशी -   कर्क राशीच्या लोकांसाठीही चंद्राचे हे गोचर सौभाग्यवर्धक ठरणार आहे. तुमच्या अनेक इच्छांची पूर्तता होईल. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल, तसेच गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांकडून शुभवार्ता मिळतील. आरोग्य उत्तम राहील, मन प्रसन्न होईल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक स्थितीही समाधानकारक राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
लोकांनी नावं ठेवली,आता तुमची वेळ आली! धनत्रयोदशीत चंद्राचे महागोचर, या राशींकडे अफाट पैसा येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल