तब्बल ८०० वर्षांनी दिवाळीत आले ५ राजयोग, या राशीच्या लोकांच्या तिजोरीत होणार घसघशीत वाढ
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक वर्षी सणांच्या काळात काही विशेष ग्रहस्थिती निर्माण होतात, ज्यामुळे शुभ योग किंवा राजयोग तयार होतात. यंदाच्या दिवाळीत अशीच एक दुर्मीळ आणि अत्यंत शुभ ग्रहयोगांची संगती तयार होत आहे.
advertisement
1/6

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक वर्षी सणांच्या काळात काही विशेष ग्रहस्थिती निर्माण होतात, ज्यामुळे शुभ योग किंवा राजयोग तयार होतात. यंदाच्या दिवाळीत अशीच एक दुर्मीळ आणि अत्यंत शुभ ग्रहयोगांची संगती तयार होत आहे. तब्बल ८०० वर्षांनंतर एकाच वेळी पाच शक्तिशाली राजयोग, शुक्रादित्य योग, हंस महापुरुष योग, नीचभंग राजयोग, नवपंचम राजयोग आणि कालक्षी राजयोग निर्माण होणार आहेत.
advertisement
2/6
हे पाचही राजयोग धन, वैभव, यश आणि प्रगतीचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या प्रभावामुळे सर्व राशींवर काही ना काही परिणाम होणार असला, तरी चार राशींसाठी ही दिवाळी विशेषतः शुभ आणि भाग्यवर्धक ठरणार आहे. या राशींच्या जातकांवर लक्ष्मीदेवीची कृपा होऊन, अचानक आर्थिक लाभ, करिअरमध्ये उन्नती आणि कौटुंबिक आनंद मिळण्याची शक्यता आहे. पाहूया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
3/6
कर्क राशी - या राशीसाठी दिवाळीचा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. तुमच्या लग्नात गुरु ग्रह हंस महापुरुष योग निर्माण करीत आहे, तर गोचर कुंडलीच्या दुसऱ्या भावात कलाक्ति योग तयार होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला समाजात मान-सन्मान, कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील, अनपेक्षित आर्थिक लाभ होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यावसायिकांना मोठा व्यवसायिक करार किंवा गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. विवाहितांना वैवाहिक जीवनात आनंद आणि स्थिरता लाभेल.
advertisement
4/6
मकर राशी - या राशीच्या जातकांसाठीही ही दिवाळी विशेष फलदायी आहे. हंस राजयोग तुमच्या सातव्या भावात निर्माण होईल, तर नवव्या भावात कलाक्ति योग आणि कर्म भावात शुक्रादित्य योग तयार होणार आहे. या काळात करिअर आणि व्यवसायात उल्लेखनीय प्रगती होईल. नोकरीत असलेल्यांना बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा होईल. विवाहित जोडप्यांमध्ये सौहार्द वाढेल, आणि अपत्यप्राप्तीचा योगही संभवतो. घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी हा काळ अनुकूल आहे. जीवनात स्थिरता आणि आत्मविश्वास वाढेल.
advertisement
5/6
तूळ राशी - या राशीच्या जातकांसाठी पाचही राजयोगांचे प्रभाव सकारात्मक राहतील. कर्मभावावर हंस योग, लग्नभावावर शुक्रादित्य योग आणि बाराव्या भावात कलाक्ति योग तयार होत आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या, बढती आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायिकांना नवीन प्रकल्पात गुंतवणुकीच्या संधी मिळतील. जुनी थकलेली रक्कम मिळू शकते, तसेच अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे. कामगिरीचे कौतुक होऊन समाजात प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
6/6
वृषभ राशी - वृषभ राशीच्या जातकांसाठीही ही दिवाळी परिवर्तन आणि यश घेऊन येईल. नवपंचम आणि कालक्षी राजयोगामुळे करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. पूर्वी अडलेली कामे पूर्ण होतील, आणि वरिष्ठांचा विश्वास मिळेल. आर्थिक क्षेत्रात प्रगती होऊन धनवृद्धीची शक्यता आहे. नवीन संपत्ती किंवा वाहन खरेदीचा योग संभवतो. वैवाहिक जीवनात आनंद, आणि तरुणांना प्रेमसंबंधात स्थैर्य मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
तब्बल ८०० वर्षांनी दिवाळीत आले ५ राजयोग, या राशीच्या लोकांच्या तिजोरीत होणार घसघशीत वाढ