TRENDING:

Astrology 2026: नवीन वर्षात काहीच बदलणार नाही! आहे ते आहे तसं सुरू ठेवण्यातच या राशींचा फायदा

Last Updated:
Astrology 2026: आपल्या सर्वांना कदाचित माहीतच असेल ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा खूप शक्तिशाली ग्रह मानला जातो. प्रत्येकाच्या मनात शनिविषयी भीती असते. शनी आपली स्थिती बदलतो तेव्हा त्याचा प्रत्येक राशीवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. ज्योतिषांच्या मते, शनि जेव्हा राशी बदलते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे काही राशींना साडेसाती आणि काहींना अडीचकी सुरू होते.
advertisement
1/6
नवीन वर्षात काहीच बदलणार नाही! आहे ते आहे तसं सुरू ठेवण्यातच या राशींचा फायदा
द्रिक पंचांगानुसार, शनी सध्या मीन राशीत आहे आणि 28 नोव्हेंबर रोजी तो मीन राशीतच सरळ मार्गी झाला. जुलै 2026 मध्ये शनी पुन्हा मीन राशीत वक्री होईल, त्यामुळे काही राशींना सावध राहण्याचा सल्ला दिला जातोय. जाणून घेऊया अशा राशींबद्दल ज्यांना 2026 मध्ये शनीच्या स्थितीमुळे काळजी घ्यावी लागेल.
advertisement
2/6
मेष - 2026 मध्ये साडेसातीचा पहिला टप्पा मेष राशीवर राहील. या नवीन वर्षात नोकरीत बदल, तब्येत बिघडण्याची आणि कौटुंबिक तणावाची शक्यता आहे. मानसिक दडपणही जास्त असेल. सर्व काही गोष्टी संयमाने हाताळाव्या लागतील.
advertisement
3/6
कुंभ - सध्या शनिदेव मीन राशीत विराजमान असून त्याचा थेट परिणाम कुंभ राशीच्या दुसऱ्या घरावर होत आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तो संपताच तुम्हाला शनीची कृपा मिळू लागेल. पण, 2026 हे वर्ष थोडे आव्हानात्मक असेल. मानसिक तणाव वाढू शकतो. छोट्या कामांना जास्त वेळ लागू शकतो. ऑफिसमध्ये तुम्हाला राजकारणाचा सामना करावा लागू शकतो. अनेक लोकांचा आरोग्यावरील खर्चही वाढू शकतो.
advertisement
4/6
मीन - मीन राशीत शनिदेव स्वतः उपस्थित असून येथे साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे, तो सर्वात कठीण मानला जातो. या टप्प्यात शनी अधिक परीक्षा घेतो. 2026 मध्ये मीन राशीच्या लोकांना आरोग्य, पैसा आणि नोकरी या तिन्ही क्षेत्रात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सहकाऱ्यांसोबत वाद किंवा गैरसमजही वाढू शकतात.
advertisement
5/6
सिंह - सिंह राशीच्या लोकांवर शनिची अडीचकी आहे. या काळात आठव्या भावात शनीचे स्थान आरोग्य आणि करिअरमध्ये अडचणी आणू शकते. 2026 मध्ये या लोकांचा खर्च वाढू शकतो, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे ठरेल. कामात स्थिरता ठेवावी लागेल.
advertisement
6/6
धनू - 2026 मध्ये धनु राशीच्या चौथ्या चरणावर शनीच्या अडीचकीचा प्रभाव असेल. यामुळे जीवनातील चढ-उतार आणि तणाव वाढू शकतो. लहानसहान गोष्टीही कुटुंबात वादाचे कारण बनू शकतात. धनु राशीच्या लोकांनी इतरांच्या कामात अडकणे टाळावे, अन्यथा परिस्थिती जास्त बिकट होऊ शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology 2026: नवीन वर्षात काहीच बदलणार नाही! आहे ते आहे तसं सुरू ठेवण्यातच या राशींचा फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल