'असे कपडे घातलेस तर...' सीन सुरू असतानाच झीनत अमानवर ओरडला सुपरस्टार, 46 वर्षांनी शेअर केली ती घटना, म्हणाल्या...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Zeenat Aman: झीनत अमान यांनी १९७९ सालीच्या 'द ग्रेट गॅम्बलर' चित्रपटातील एक क्लिप शेअर केली आणि यासोबतच जुने सामाजिक मापदंड आणि सध्याच्या बदलांवर त्यांनी सडेतोड भाष्य केले आहे.
advertisement
1/9

मुंबई: सत्तरच्या दशकातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री झीनत अमान सध्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडिया पोस्टमुळे त्या चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर १९७९ साली आलेल्या 'द ग्रेट गॅम्बलर' चित्रपटातील एक क्लिप शेअर केली आणि यासोबतच जुने सामाजिक मापदंड आणि सध्याच्या बदलांवर त्यांनी सडेतोड भाष्य केले आहे.
advertisement
2/9
झीनत अमान यांना अनेकदा त्यांच्या जुन्या चित्रपटांच्या क्लिप्स पाहण्याची आवड आहे. अशातच त्यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा 'द ग्रेट गॅम्बलर'मधील एक सीन मिळाला.
advertisement
3/9
या सीनमध्ये एका मुलाने झीनत अमान यांना छेडले असते आणि त्या मुलाला त्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. पण तिथे अमिताभ बच्चन इन्स्पेक्टरच्या भूमिकेत झीनतलाच उलट सुनावतात. ते म्हणतात, "तू ज्या प्रकारचे कपडे परिधान केले आहेत, तर मुलं असेच करणार!"
advertisement
4/9
'स्वतःच आमंत्रण देतेस' असा टोमणा मारणाऱ्या इन्स्पेक्टरचा रोल आणि हा डायलॉग ४६ वर्षांपूर्वीच्या समाजाची मानसिकता दर्शवतो. झीनत अमान यांनी सुरुवातीला काही गोष्टी बदलल्याबद्दल आनंद व्यक्त केला, पण काही गोष्टी आजही तशाच असल्याचा खेदही व्यक्त केला.
advertisement
5/9
झीनत यांनी लिहिले, "आम्ही तरुण असताना वाटायचे की, समाजाचे कठोर नियम कधीच बदलणार नाहीत. पण हळूहळू वेळ सरला आणि आज पाहते, तर खूप काही बदलले आहे."
advertisement
6/9
"ठीक आहे, सर्वकाही बदलत नाही. आजही काही नैतिकता पाळणारे लोक जगात आहेत. तरीही, लोकांचा विचार करण्याची पद्धत नक्कीच बदलली आहे," असे त्या म्हणाल्या.
advertisement
7/9
हा जुना सीन पाहून आजच्या पिढीतील मुलींची प्रतिक्रिया काय आहे, हे सांगताना झीनत यांना हसू आवरले नाही. झीनतने एका तरुण मुलीला हा सीन दाखवला. ती मुलगी इन्स्पेक्टर विजयला पाहून म्हणाली, "काय लूजर आहे यार!" हे ऐकून झीनत यांना खूप हसू आले.
advertisement
8/9
झीनत अमान यांनी आपले मत मांडताना सांगितले, "मी पूर्णपणे मानते की प्रत्येकाला आपल्या आवडीचे कपडे घालण्याचा हक्क आहे, पण जगात अजूनही आपली विचारसरणी चालत नाही. विशिष्ट ठिकाणी विशिष्ट कपडे जास्त योग्य वाटतात."
advertisement
9/9
"माझे सगळे केस पांढरे झाले आहेत, त्यामुळे थोडं समजून घ्या. पण आजच्या जगातले आणि नवीन नियम समजून घेणाऱ्या लोकांचे मत मला जाणून घ्यायचे आहे," असे म्हणत त्यांनी चाहत्यांना त्यांचे मत विचारले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'असे कपडे घातलेस तर...' सीन सुरू असतानाच झीनत अमानवर ओरडला सुपरस्टार, 46 वर्षांनी शेअर केली ती घटना, म्हणाल्या...