TRENDING:

याला म्हणतात नशीब! आज दत्त जयंतीपासून 3 राशींचे सोन्याचे दिवस झाले सुरू, पैशांसह घरात आनंदी आनंद येणार

Last Updated:
Datta Jayanti 2025 :  मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्तात्रेय जयंती उत्साहात साजरी केली जाते.
advertisement
1/5
आज दत्त जयंतीपासून  3 राशींचे सोन्याचे दिवस झाले सुरू, पैशांसह घरात आनंद येणार
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला दत्तात्रेय जयंती उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीची दत्त जयंती विशेष ठरणार आहे, कारण या दिवशी अनेक दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाणारे योग जुळून आले आहेत. चंद्राचा वृषभ राशीत प्रवेश आणि त्याच राशीत गुरु ग्रहाची उपस्थिती यामुळे शिव गौरी शुभ योगाची निर्मिती झाली आहे.
advertisement
2/5
चंद्र–गुरू युतीमुळे तयार होणारा हा योग समृद्धी, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारा मानला जातो. याशिवाय दत्त जयंतीच्या दिवशी अमृत सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्राचा संयोगही लाभदायी ठरणार आहे. या सर्व शुभ घटकांच्या एकत्रित परिणामामुळे आज 4 डिसेंबरपासून तीन राशींवर दत्ताची विशेष कृपा राहणार असल्याचे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. कोणत्या राशींना लाभ होणार आहे, पाहूयात...
advertisement
3/5
<strong>वृषभ रास -</strong> वृषभ राशीच्या लोकांसाठी या वर्षीची दत्त जयंती भाग्यवर्धक ठरणार आहे. शिव गौरी योगासोबत गजकेसरी योगही सक्रिय होत असल्याने या राशीला कार्यक्षेत्रात मोठी प्रगती दिसू शकते. नोकरी किंवा व्यवसायात अडकलेली कामे वेगाने मार्गी लागतील. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. बराच काळ थांबलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सौहार्द वाढेल आणि कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. विवाहित जोडप्यांचे नातेसंबंध अधिक गोड होतील तर अविवाहितांसाठी चांगल्या प्रस्तावांची शक्यता आहे. मानसिक दृष्ट्या आत्मविश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता सुधरेल.
advertisement
4/5
<strong>कन्या रास  -</strong> कन्या राशीच्या व्यक्तींसाठी यंदाची दत्त जयंती अतिशय लाभदायी मानली जात आहे. गजकेसरी योगामुळे नोकरी, शिक्षण आणि व्यवसायात शुभ परिणाम मिळण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि पालकांचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नती किंवा अपेक्षित कामगिरीचा मान मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे समाधानकारक फळ दिसेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून बोनस किंवा पगारवाढीचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात प्रेम, समजूतदारी आणि आनंद वाढेल. व्यवसायात प्रगतीसह नवे प्रकल्प सुरू करण्यासाठीही हा काळ उत्तम आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी यंदाची दत्त जयंती अतिशय लाभदायी मानली जात आहे. गजकेसरी योगामुळे नोकरी, शिक्षण आणि व्यवसायात शुभ परिणाम मिळण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि पालकांचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नती किंवा अपेक्षित कामगिरीचा मान मिळण्याची शक्यता आहे. मेहनतीचे समाधानकारक फळ दिसेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून बोनस किंवा पगारवाढीचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात प्रेम, समजूतदारी आणि आनंद वाढेल. व्यवसायात प्रगतीसह नवे प्रकल्प सुरू करण्यासाठीही हा काळ उत्तम आहे.
advertisement
5/5
<strong>वृश्चिक रास-</strong> वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दत्त जयंतीपासूनचा काळ अत्यंत शुभ फळदायी ठरू शकतो. गजकेसरी योग या राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक आणि आर्थिक लाभ देणारा आहे. करिअरमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात अपेक्षित नफा मिळू शकतो तसेच मोठ्या करारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जोडीदार आणि मुलांकडून आनंददायक बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील आणि आर्थिक स्थैर्य वाढेल. आरोग्याशी संबंधित त्रास कमी होईल आणि शारीरिक-मानसिक ऊर्जा वाढेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
याला म्हणतात नशीब! आज दत्त जयंतीपासून 3 राशींचे सोन्याचे दिवस झाले सुरू, पैशांसह घरात आनंदी आनंद येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल