Sholay मधला अभिनेता, इंदिरा गांधींचा मावस भाऊ, स्वातंत्र्यलढ्यात तीन वर्ष भोगला तुरुंगवास, एकेकाळी करायचा टेलरिंग
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sholay Fame Actor : 'शोले' या सुपरहिट चित्रपटातील अनेक कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याकडे कधी कोणी लक्ष दिलं नाही. पण या चित्रपटातील एक अभिनेता इंदिरा गांधी यांचा मावस भाऊ होता.
advertisement
1/7

'शोले' हा 1975 रोजी प्रदर्शित झालेला आयकॉनिक हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, संजीव कुमार, जया भादुरी आणि अमदज खान असे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. आजही हा चित्रपट पुन्हा-पुन्हा पाहिला जातो. या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग आहे. असंख्य कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. पण हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कधी चर्चेत आले नाहीत.
advertisement
2/7
'शोले' या चित्रपटातील अनेक कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याकडे लोकांचं कमी लक्ष गेलं. पण तरी या चित्रपटासाठी त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं. या दिग्गज कलाकारांपैकी एक नाव म्हणजे ए. के. हंगल (AK Hangal).
advertisement
3/7
ए.के. हंगल यांनी 'शोले' या चित्रपटात 'इमाम चाचा' ही छोटी भूमिका साकारली होती. आपल्या छोट्या भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांवर चांगलाच प्रभाव टाकला. विशेष म्हणजे ए.के. हंगल यांचं देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि नंतर इंदिरा गांधी यांच्या कुटुंबासोबत दूरचं नातं होतं.
advertisement
4/7
ए.के. हंगल यांनी सिनेसृष्टीत थोडा उशिरा प्रवेश केला. त्यानंतर अनेक दशके त्यांनी सातत्याने काम केलं. शांत आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली. हंगल यांचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षमय होते. पाकिस्तानातील सियालकोट याठिकाणी ए.के. हंगल यांचा जन्म झाला. त्यानंतर पेशावर येथे त्यांचं बालपण गेलं.
advertisement
5/7
ए.के. हंगल यांनी सुरुवातील टेलरिंगचंही काम केलं आहे. पुढे ते स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले. स्वातंत्र्यलढ्यातील सक्रिय सहभागामुळे त्यांना तीन वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. देशाच्या फाळणीनंतर ते मुंबईत आले आणि रंगभूमीपासून सुरुवात करून हळूहळू चित्रपटांकडे वळले. त्यांच्या प्रामाणिक प्रतिमेमुळे आणि भूमिकांमुळे काही वेळा वादही झाले. एका काळी त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. ज्याचा त्यांच्या करिअरवर स्पष्ट परिणाम झाला.
advertisement
6/7
ए.के. हंगल यांचे वय वाढू लागले तसे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. 2007 मध्ये त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा उपचारांचा खर्च उचलणेदेखील कठीण झाले होते. त्या वेळी अमिताभ बच्चन यांनी पुढे येत 20 लाख रुपयांची मदत केली. या गोष्टीची सर्वत्र चर्चा झाली.
advertisement
7/7
ए.के. हंसल यांचे वयाच्या 97 वर्षी निधन झाले. ए.के. हंसल यांचे निधन झाले त्यावेळी चित्रपटसृष्टीतील फक्त काही कलाकार त्यांच्या अंतिमसंस्काराला उपस्थित होते. पण तरीही हंगल यांचे कार्य, त्यांची साधी जीवनशैली आणि त्यांचा संघर्ष या गोष्टीचे भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजही विशेष स्थान आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sholay मधला अभिनेता, इंदिरा गांधींचा मावस भाऊ, स्वातंत्र्यलढ्यात तीन वर्ष भोगला तुरुंगवास, एकेकाळी करायचा टेलरिंग