आज ३० ऑक्टोबरपासून ५ राशींच्या नशिबाचे दरवाजे खुले होणार, मोठी संधी चालून येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ३० ऑक्टोबरचा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस दत्तगुरूंना समर्पित असून भक्तीभावाने केलेल्या प्रार्थना, दान आणि जप यांचा विशेष लाभ मिळतो, असे मानले जाते.
advertisement
1/6

३० ऑक्टोबरचा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानला जातो. हा दिवस दत्तगुरूंना समर्पित असून भक्तीभावाने केलेल्या प्रार्थना, दान आणि जप यांचा विशेष लाभ मिळतो, असे मानले जाते. त्याचवेळी शुक्र ग्रहाचा संक्रमणही होत असल्याने काही राशींवर दत्तगुरूंची कृपा आणि काहींवर ग्रहांचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. पाहूया, उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी भाग्यवर्धक ठरणार आहे.
advertisement
2/6
मेष - राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस अत्यंत शुभदायी राहील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. काही विरोधक तुमच्याबद्दल नकारात्मक बोलू शकतात, पण त्यांच्या गोष्टींना महत्त्व न देता आपल्या मार्गावर ठाम रहा. दानधर्म आणि पुण्यकर्म केल्याने मानसिक समाधान मिळेल. देवी लक्ष्मीची कृपा राहिल्यामुळे आर्थिक स्थैर्य वाढेल.
advertisement
3/6
मिथुन - राशीच्या व्यक्तींना उद्याचा दिवस अत्यंत फलदायी ठरेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्यातून प्रगतीचे दरवाजे उघडतील. दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतील. मित्रांकडून महत्त्वाची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य आहे. आत्मविश्वास आणि बोलण्यातील गोडवा तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल.
advertisement
4/6
सिंह - राशीच्या लोकांसाठी उद्या सकारात्मकतेने भरलेला दिवस असेल. सकाळपासूनच मन प्रसन्न राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो आणि त्या प्रवासातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आणि सहकारी तुमच्या कामावर खूश राहतील. मात्र, नको त्या वादांपासून दूर राहा. शांतता राखल्यास शुभ फळे मिळतील.
advertisement
5/6
वृश्चिक - राशीच्या लोकांना उद्याचा दिवस भाग्यवर्धक ठरणार आहे. नशिबाची साथ मिळेल आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. पैशांचे अडथळे दूर होतील. काही दिवसांपासून अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. दानधर्मात सहभाग घेतल्याने मानसिक शांती मिळेल आणि देवी लक्ष्मीची कृपा वाढेल.
advertisement
6/6
मीन - राशीसाठी उद्याचा दिवस लाभदायी असेल. सकाळपासूनच चांगल्या बातम्यांनी दिवसाची सुरुवात होईल. काही कारणास्तव आर्थिक खर्च वाढू शकतो, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासाचे योग संभवतात, ज्यातून लाभ होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पनांना महत्त्व दिले जाईल. दत्तगुरूंच्या कृपेने मानसिक शांती आणि आत्मविश्वास लाभेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
आज ३० ऑक्टोबरपासून ५ राशींच्या नशिबाचे दरवाजे खुले होणार, मोठी संधी चालून येणार