TRENDING:

Weather Alert: पुणे, सोलापूर ते कोल्हापूर, आज कुठं कोसळणार? IMD कडून हवामानाचं अपडेट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. आज पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
1/7
पुणे, सोलापूर ते कोल्हापूर, आज कुठं कोसळणार? IMD कडून हवामानाचं मोठं अपडेट
'मोंथा' चक्रीवादळ निवळल्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण झाले आहे. आज 30 ऑक्टोबर रोजी विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, तसेच उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यात मंगळवारी 30.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंशावर राहिल.
advertisement
3/7
मागील 24 तासात सातारा जिल्ह्यात 30.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज संपूर्ण साताऱ्यासह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह हलका पाऊस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कमाल तापमानाचा पारा 29 अंशावर राहिल.
advertisement
4/7
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी 27.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
गेल्या 24 तासात सोलापूर जिल्ह्यात 28.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर 0.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 32 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
6/7
सांगली जिल्ह्यात मागील 24 तासात 29.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच 0.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी पारा 28 अंशावर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसासह तापमानातील चढ-उतार सुरूच आहेत. आज पुणे ते कोल्हापूर पाचही जिल्ह्यांत विजांसह गडगडाटी पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: पुणे, सोलापूर ते कोल्हापूर, आज कुठं कोसळणार? IMD कडून हवामानाचं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल