अरे देवा! १८ ऑक्टोबरपासून गुरु ग्रह या राशींवर आणणार मोठं संकट, आर्थिक नुकसान होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनाला म्हणजेच गोचराला फार मोठं महत्त्व आहे. विशेषतः गुरू ग्रहाचा गोचर हा सर्वाधिक प्रभावी मानला जातो.
advertisement
1/6

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनाला म्हणजेच गोचराला फार मोठं महत्त्व आहे. विशेषतः गुरू ग्रहाचा गोचर हा सर्वाधिक प्रभावी मानला जातो. कारण गुरू हा देवगुरू मानला जातो आणि त्याचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर थेट पडतो. साधारणपणे गुरू दरवर्षी एकदाच राशी बदलतो, मात्र यंदा त्याची गती बदलली असून तो अतिचारी गतीने प्रवास करत आहे. ज्योतिषशास्त्रात एखादा ग्रह आपल्या नेहमीच्या गतीपेक्षा वेगाने चालतो तेव्हा त्याला अतिचारी गती म्हणतात.
advertisement
2/6
याच अनुषंगाने, गुरूने १४ मे २०२५ रोजी मिथुन राशीत प्रवेश केला होता. परंतु अल्पावधीतच तो पुन्हा आपली दिशा बदलणार आहे. येत्या १८ ऑक्टोबर २०२५ रोजी गुरू कर्क राशीत प्रवेश करेल आणि केवळ दीड महिन्यांनंतर म्हणजेच ५ डिसेंबर २०२५ रोजी तो पुन्हा मिथुन राशीत परतणार आहे. या अल्पकाळातील बदलामुळे राशिचक्रावर मोठा परिणाम होईल. काही राशींना लाभ होईल तर काहींना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. विशेषतः तीन राशींवर या गोचराचा प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
advertisement
3/6
<strong>वृषभ राशी -</strong> गुरूचा हा गोचर तुमच्या तृतीय भावात होत असल्याने वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. अचानक खर्च वाढू शकतो ज्यामुळे आर्थिक स्थिती अस्थिर होईल. शारीरिकदृष्ट्या थकवा जाणवेल आणि आरोग्य खालावेल. वैवाहिक किंवा कौटुंबिक नात्यांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. कामकाज मंदावेल आणि गुंतवलेले पैसे अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे.
advertisement
4/6
<strong>सिंह राशी -</strong> या काळात सिंह राशीच्या लोकांना आळस आणि निष्क्रियतेचा सामना करावा लागू शकतो. अनेक अपूर्ण राहिलेली कामं अडकून बसू शकतात. शत्रू सक्रिय होतील आणि तुमच्यावर गुपचूप डाव खेळू शकतात. त्यामुळे कार्यक्षेत्रात तसेच समाजात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कोणावरही अति विश्वास ठेवू नका आणि गुपितं कोणाशीही शेअर करू नका. आर्थिक निर्णय घेताना अनुभवसंपन्न व्यक्तींचा सल्ला घ्या, अन्यथा तोटा होऊ शकतो.
advertisement
5/6
<strong>कुंभ राशी -</strong> गुरूचा गोचर तुमच्या षष्ठम भावात होत असल्याने मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढेल, ज्यामुळे अपेक्षित यश मिळवण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागतील. या काळात कर्ज घेणं किंवा देणं टाळावं; अन्यथा अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ थोडा प्रतिकूल आहे. बाहेरचे तळलेले पदार्थ खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी व्यवहार टाळणं हितावह ठरेल.
advertisement
6/6
एकूणच दिवाळीपूर्वी होणारा गुरूचा हा अतिचारी गोचर काही राशींसाठी कसोटीचा काळ घेऊन येत आहे. वृषभ, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांना या काळात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. मात्र संयम, सावधगिरी आणि योग्य नियोजन यांद्वारे या अडचणींवर मात करणं शक्य आहे. गुरूचे हे वेगवान परिवर्तन जीवनात अनेक शिकवणी घेऊन येईल, ज्यातून पुढील काळात सकारात्मक बदल साध्य करता येतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अरे देवा! १८ ऑक्टोबरपासून गुरु ग्रह या राशींवर आणणार मोठं संकट, आर्थिक नुकसान होणार