Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर त्सुनामी, फक्त 2 दिवसांत 'कांतारा चॅप्टर 1' 100 कोटींच्या पार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Kantara Chapter 1 Box Office Collection : कांतारा चॅप्टर 1 ने दोन दिवसांत 100 कोटी पार केले आहेत. सिनेमाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन किती झालंय पाहूयात.
advertisement
1/7

ऋषभ शेट्टी 'कांतारा चॅप्टर 1' ने दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवशीच्या तुलनेत थोडी कमाई झाली असली तरी दोन दिवसात सिनेमा 150 कोटींची पुढे गेला आहे. 'कांतारा चॅप्टर 1' ने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली.
advertisement
2/7
SACNILC च्या रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1'ने भारतात पहिल्या दिवशी 61.95 कोटी रुपये कमावले. चित्रपटाच्या कन्नड आणि हिंदी वर्जनने जवळजवळ सारखीच कमाई केली.
advertisement
3/7
पहिल्या दिवशी 'कांतारा चॅप्टर 1' ने कन्नड वर्जनमध्ये 19.6 कोटी, हिंदीत 18.5 कोटी, तेलुगूत 13 कोटी, तमिळ 5.5 कोटी आणि मल्याळममध्ये 5.25 कोटी रुपये कमावले.
advertisement
4/7
कांताराच्या दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन पाहायला गेल्यास ACNILC च्या रिपोर्टनुसार रात्री 10 वाजेपर्यंत कांतारा चॅप्टर 1चं कलेक्शन 45.65 कोटी रुपये झालं.
advertisement
5/7
भारतात चित्रपटाचं दोन दिवसांचं एकूण कलेक्शन 105.5 कोटी झाला आहे. सिनेमाच्या हिंदी वर्जनने 12-13 कोटींचं कलेक्शन केलं आहे.
advertisement
6/7
यासह, 'कांतारा चॅप्टर 1' हा वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट बनला आहे. गेल्या महिन्यात 92 कोटी कमाई करणाऱ्या 'सु फ्रॉम सो' चित्रपटाला मागे टाकलं आहे.
advertisement
7/7
'कांतारा' हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट होता. 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं 400 कोटींहून अधिक कमाई केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर त्सुनामी, फक्त 2 दिवसांत 'कांतारा चॅप्टर 1' 100 कोटींच्या पार