TRENDING:

अरे देवा! ज्याची भीती होती तेच घडणार, १० नोव्हेंबरपासून या राशींवर येणार सर्वात मोठं संकट

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला ‘ग्रहांचा राजकुमार’ म्हटले जाते. बुध ग्रह बुद्धी, संवाद, व्यापार, शिक्षण आणि तर्कशक्तीचा कारक मानला जातो.
advertisement
1/6
ज्याची भीती होती तेच घडणार, १० नोव्हेंबरपासून या राशींवर येणार सर्वात मोठं संकट
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला ‘ग्रहांचा राजकुमार’ म्हटले जाते. बुध ग्रह बुद्धी, संवाद, व्यापार, शिक्षण आणि तर्कशक्तीचा कारक मानला जातो. हा ग्रह जेव्हा वक्री होतो, म्हणजेच आपल्या नियमित गतीच्या उलट दिशेने चालतो, तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर जाणवतो. अनेकदा या काळात जुन्या गोष्टी, संबंध आणि अडचणी पुन्हा समोर येतात.
advertisement
2/6
बुध ग्रह कधी वक्री होणार? - ज्योतिषशास्त्रानुसार येत्या १० नोव्हेंबर २०२५ रोजी रविवारी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी बुध ग्रह वृश्चिक राशीत वक्री होणार आहे. ही वक्री चाल जवळपास २० दिवसांपर्यंत म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंत राहील. या काळात बुध ग्रहाची दृष्टी तिसऱ्या, सातव्या आणि दहाव्या स्थानी असल्याने काही राशींवर याचा तीव्र प्रभाव पडणार आहे. संवादातील चुका, गैरसमज, व्यवसायातील नुकसान आणि वैवाहिक तणाव या काळात वाढू शकतात.
advertisement
3/6
मेष - बुध ग्रह मेष राशीत आठव्या भावात वक्री होणार आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत तणाव संभवतो. कर्ज वाढणे, आरोग्याशी निगडित त्रास आणि बोलण्यातून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. उपाय-बुधवारच्या दिवशी हिरवे मूग दान करा आणि ‘ॐ बुं बुधाय नमः’ हा मंत्र १०८ वेळा जप करा.
advertisement
4/6
वृषभ - या राशीसाठी बुध ग्रह सातव्या भावात वक्री होत असल्याने पार्टनरशिप, विवाह आणि व्यावसायिक संबंधांवर नकारात्मक प्रभाव दिसून येईल. जोडीदाराशी वाद, गैरसमज आणि नात्यांतील दुरावा वाढू शकतो. व्यवसायिक भागीदारीही तुटण्याची शक्यता आहे. उपाय - बुधवारच्या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. या काळात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका.
advertisement
5/6
सिंह - सिंह राशीसाठी बुध ग्रह चौथ्या भावात विराजमान असेल. त्यामुळे घरगुती वातावरण, मालमत्तेचे वाद आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते. प्रॉपर्टी संदर्भात वाद उद्भवू शकतात. आरोग्याची काळजी घ्या आणि गुंतवणुकीपासून दूर रहा. उपाय - विष्णू मंदिरात दूध अर्पण करा, तसेच हिरव्या रंगाचे कपडे दान करा. मानसिक शांतीसाठी ध्यान-प्रार्थना करा.
advertisement
6/6
धनु - धनु राशीसाठी बुध ग्रह बाराव्या भावात वक्री राहणार आहे. या भावात खर्च, प्रवास आणि नुकसानाशी संबंधित योग बनतात. अनावश्यक खर्च वाढणे, प्रवासातील त्रास आणि जुन्या आजारांचा पुनरावृत्तीचा धोका संभवतो. उपाय -बुधवारी उपवास करा, हिरव्या भाज्या किंवा फळे दान करा. खर्च नियंत्रणात ठेवा आणि आरोग्याकडे लक्ष द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अरे देवा! ज्याची भीती होती तेच घडणार, १० नोव्हेंबरपासून या राशींवर येणार सर्वात मोठं संकट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल