अरे देवा! २०२६ सुरू होताच मंगळ ४ महीने या ५ राशींवर आणणार मोठं संकट, उपाय काय कराल?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Aatrology News : २०२५ वर्षाचा शेवट जवळ आला असून, २०२६ चे नवीन वर्ष आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. नववर्षाची सुरुवात अनेकांसाठी नवीन आशा, संधी आणि बदल घेऊन येते.
advertisement
1/7

२०२५ वर्षाचा शेवट जवळ आला असून, २०२६ चे नवीन वर्ष आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. नववर्षाची सुरुवात अनेकांसाठी नवीन आशा, संधी आणि बदल घेऊन येते. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार २०२६ हे वर्ष काही राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. कारण या वर्षाच्या पहिल्याच महिन्यांत ग्रहांचा अधिपती मंगळ अस्त अवस्थेत राहणार आहे. मंगळ ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अस्त झाला असून तो २०२६ च्या एप्रिलपर्यंत अस्त राहणार आहे. मंगळाचा हा दीर्घकालीन अस्त पाच राशींसाठी अडचणी आणि तणाव वाढवू शकतो, असे ज्योतिषांनी सांगितले आहे.
advertisement
2/7
सध्या मंगळ स्वतःच्या राशीत म्हणजेच वृश्चिक राशीत आहे. सामान्यतः ग्रह स्वतःच्या राशीत असणे शुभ मानले जाते, परंतु अस्त अवस्थेमुळे त्याचा प्रभाव कमी होतो आणि शुभ फळांऐवजी अडथळे निर्माण होतात. रुचक राजयोग तयार असूनही मंगळाचा अस्त हा राजयोगाची ताकद कमी करू शकतो. त्यामुळे करिअर, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक संबंध या सर्व क्षेत्रांवर त्याचा परिणाम दिसून येईल.
advertisement
3/7
मिथुन राशी - मंगळाच्या अस्तामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागेल. मेहनत करूनही अपेक्षित यश मिळण्यात अडचण येईल. व्यावसायिक लोकांना आर्थिक नुकसान किंवा व्यवहारांमध्ये विलंबाचा सामना करावा लागू शकतो. नव्या गुंतवणुकीपासून दूर राहणे श्रेयस्कर ठरेल. वैवाहिक जीवनात गैरसमज आणि मतभेद संभवतात. शांततेने आणि विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे.
advertisement
4/7
सिंह राशी - सिंह राशीच्या लोकांसाठीही मंगळाचा अस्त त्रासदायक ठरू शकतो. या काळात भावनिक अस्थिरता वाढेल आणि रागामुळे संबंध बिघडू शकतात. खर्चाचे प्रमाण वाढेल, विशेषतः आरोग्यसंबंधी कारणांवर. दिखाव्यासाठी खर्च केल्यास आर्थिक संकट वाढू शकते. अनावश्यक वाद-विवाद टाळा आणि आत्मसंयम राखा, असे ज्योतिषांचे सल्ला आहे.
advertisement
5/7
वृश्चिक राशी - मंगळ ही वृश्चिक राशीची स्वामी ग्रह आहे आणि त्याच राशीत तो अस्त होत असल्याने या राशीच्या व्यक्तींना विशेष काळजी घ्यावी लागेल. कामकाजात अडथळे येतील, नियोजित गोष्टी वेळेवर पूर्ण होणार नाहीत. आरोग्याच्या बाबतीत पाठदुखी किंवा ताणतणाव वाढू शकतो. या काळात अनावश्यक खर्च आणि राग या दोन्ही गोष्टींपासून दूर राहणे हिताचे ठरेल.
advertisement
6/7
मीन राशी मंगळाच्या अस्तामुळे मीन राशीच्या व्यक्तींना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात. व्यावसायिक क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या आणि दबाव वाढू शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत तणाव टाळावा आणि निर्णय घेताना संयम बाळगावा.
advertisement
7/7
कर्क राशी - कर्क राशीच्या लोकांसाठीही हा काळ विशेष सावधगिरीचा आहे. मंगळाच्या अस्तामुळे मानसिक अस्थिरता वाढेल. अचानक खर्च वाढू शकतो. प्रवासात किंवा वाहन चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे. कामातील दडपणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
अरे देवा! २०२६ सुरू होताच मंगळ ४ महीने या ५ राशींवर आणणार मोठं संकट, उपाय काय कराल?