Alcohol : पेग एकच पण परिणाम वेगळा; महिलांच्या शरीरात दारू कशाप्रकारे काम करते? परुष आणि महिलांमधील फरक आश्चर्यचकीत करणारा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास, सारख्याच प्रमाणात दारू प्यायली तरी पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीरावर त्याचे परिणाम अधिक तीव्र आणि लवकर होतात. यामागे काही महत्त्वाची जैविक कारणे आहेत.
advertisement
1/7

मद्यपान करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे ते न पिण्याचा सल्ला दिला जातो, तरी देखील शहरातील लोक हल्ली या ना त्या कार्यक्रमाला दारु पितातच. मग ती ऑफिस पार्टी असोत किंवा मग कोणताही कार्यक्रम. हल्ली पुरुष आणि महिला दोघेही दारु पितातच, पण विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास, सारख्याच प्रमाणात दारू प्यायली तरी पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीरावर त्याचे परिणाम अधिक तीव्र आणि लवकर होतात. यामागे काही महत्त्वाची जैविक कारणे आहेत.
advertisement
2/7
1. शरीरातील पाण्याचे प्रमाण (Water Content)पुरुषांच्या शरीरात महिलांच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण जास्त असते. दारू शरीरातील रक्तात मिसळली की ती पाण्यामुळे सौम्य (Dilute) होते. महिलांच्या शरीरात फॅट्सचे प्रमाण जास्त आणि पाण्याचे प्रमाण कमी असल्याने, दारू रक्तात जास्त 'कॉन्सन्ट्रेटेड' राहते. यामुळे महिलांना कमी प्रमाणात दारू प्यायली तरी लवकर 'नशा' चढते.
advertisement
3/7
2. 'ADH' एन्झाईमची कमतरताआपल्या शरीरात अल्कोहोल पचवण्यासाठी 'Alcohol Dehydrogenase' (ADH) नावाचे एन्झाईम असते. हे एन्झाईम पोटात आणि यकृतात (Liver) दारूचे विघटन करते. संशोधनानुसार, महिलांच्या शरीरात या एन्झाईमचे प्रमाण पुरुषांपेक्षा खूप कमी असते. परिणामी, दारू रक्तात मिसळण्यापूर्वी तिचे नीट विघटन होत नाही आणि ती थेट यकृतावर परिणाम करते.
advertisement
4/7
3. यकृताच्या आजारांचा धोकामहिलांच्या शरीरात दारूचे पचन हळू होत असल्यामुळे, ती जास्त काळ शरीरात राहते. यामुळे महिलांना पुरुषांपेक्षा लवकर 'Liver Cirrhosis' किंवा यकृताचे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. अगदी कमी प्रमाणात पण नियमित दारू पिणाऱ्या महिलांना यकृताचे आजार होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे.
advertisement
5/7
4. हार्मोनल बदल आणि मासिक पाळीमहिलांच्या शरीरातील हार्मोन्सचा स्तर सतत बदलत असतो. विशेषतः मासिक पाळीच्या (Menstruation) काळात किंवा ओव्हुलेशनच्या वेळी शरीरात एस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. या काळात दारू प्यायल्यास नशा अधिक वेगाने चढते आणि शरीरावर त्याचे दुष्परिणामही तीव्र होतात. तसेच, अतिमद्यपानामुळे मासिक पाळीच्या चक्रातही बिघाड होऊ शकतो.
advertisement
6/7
5. हँगओव्हरची तीव्रतामहिलांच्या शरीरातून अल्कोहोल बाहेर पडण्यास जास्त वेळ लागतो. यामुळेच दुसऱ्या दिवशी जाणवणारा 'हँगओव्हर', डोकेदुखी आणि मळमळ या गोष्टी पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रकर्षाने जाणवतात.
advertisement
7/7
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी मद्यपानासाठी प्रोत्साहन देत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Alcohol : पेग एकच पण परिणाम वेगळा; महिलांच्या शरीरात दारू कशाप्रकारे काम करते? परुष आणि महिलांमधील फरक आश्चर्यचकीत करणारा