'धुरंधर'च्या सारा अर्जुनचं क्रेझी ट्रान्सफॉर्मेशन! बॅकलेस ड्रेसमध्ये किलर लूक, सातवा फोटो पाहून व्हाल घायाळ
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sara Arjun Hot Photos: नुकतंच सारा अर्जुनने केलेलं फोटोशूट पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचा पारा चढला आहे.
advertisement
1/9

मुंबई: २०२५ च्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' नावाचं वादळ आलं आणि या वादळाने केवळ गल्लाच जमवला नाही, तर बॉलिवूडला एक नवीन सुपरस्टार दिली, ती म्हणजे सारा अर्जुन.
advertisement
2/9
चित्रपटात रणवीर सिंहच्या प्रेयसीची, म्हणजेच 'अलीना'ची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी सारा आता खऱ्या आयुष्यात आपल्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियाचा पारा चढवत आहे.
advertisement
3/9
नुकतंच तिने केलेलं फोटोशूट पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला असून तिची तुलना चक्क दीपिका पादुकोणशी केली जात आहे.
advertisement
4/9
सारा अर्जुनच्या स्टायलिस्टने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सारा मरून रंगाच्या डीप-नेक आणि बॅकलेस गाऊनमध्ये दिसतेय. तिचा हा अवतार इतका ग्लॅमरस आहे की, तीच ती 'धुरंधर'मधील साधीभोळी अलीना आहे का? असा प्रश्न अनेकांना पडलाय.
advertisement
5/9
मेसी बन, डोळ्यांवर येणारे बँग्स हेअरस्टाइल आणि अतिशय सटल मेकअप... साराचा हा नवा अवतार पाहून ती इंडस्ट्रीतील मोठी स्टार बनणार आहे, हे स्पष्ट होतंय.
advertisement
6/9
या फोटोशूटमध्ये साराने चेरी खाताना दिलेले पोझेस सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. तिची कर्वी फिगर आणि कॅमेऱ्यासमोरची तिची अदा पाहून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय.
advertisement
7/9
एका युजरने लिहिलंय, "ही मुलगी म्हणजे Gen Z ची दीपिका पादुकोण आहे!" तर दुसऱ्याने म्हटलंय, "बॉलिवूडची पुढची मोठी सुपरस्टार साराच असणार!" अवघ्या काही तासांतच या फोटोंवर लाईक्सचा पूर आला आहे.
advertisement
8/9
सारा अर्जुनसाठी 'धुरंधर' हा केवळ एक डेब्यु चित्रपट नव्हता, तर तो एक जॅकपॉट ठरला आहे. या चित्रपटाने जगभरात तब्बल १२५० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. पहिल्याच चित्रपटात रणवीर सिंहसारख्या सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करून साराने स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे.
advertisement
9/9
अनेकांना माहीत नसेल, पण सारा अर्जुनने बालकलाकार म्हणून साऊथ आणि हिंदी चित्रपटांत काम केलं आहे. मात्र, 'धुरंधर'ने तिला रातोरात मुख्य प्रवाहातील अभिनेत्री म्हणून ग्लोबल ओळख मिळवून दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'धुरंधर'च्या सारा अर्जुनचं क्रेझी ट्रान्सफॉर्मेशन! बॅकलेस ड्रेसमध्ये किलर लूक, सातवा फोटो पाहून व्हाल घायाळ