Aajache Rashibhavishya: गुरुवार गेमचेंजर ठरणार, क्षुल्लक चुकीमुळं पश्चातापाची वेळ येणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Daily Horoscope: प्रत्येक नवा दिवस नव्या संधी आणि नवी आव्हाने घेऊन येत असतो. गुरुवारी मेष ते मीन राशींच्या नशिबात काय आहे? हे आजचं राशीभविष्य नाशिकचे समीर जोशी यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
1/13

मेष राशी -तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. संध्याकाळी अचानक पाहुणे आल्याने घरात गर्दी होईल. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. मेडिकल ट्रान्सक्रिप्शनमध्ये काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशी -एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
3/13
मिथुन राशी -तुमच्या भावना खासकरून रागावर नियंत्रण ठेवा. मोठ्या योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होतात, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला आज जाणीव होईल. कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. तुमचा शुभ अंक 1 असणारा आहे.
advertisement
4/13
कर्क राशी -कामाच्या ठिकाणी सगळं आलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
5/13
सिंह राशी -हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. आज तुमचा शुभ अंक 2 आहे.
advertisement
6/13
कन्या राशी -भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असतो. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकतात. आज तुमचा शुभ अंक 9 आणारा आहे.
advertisement
7/13
तूळ राशी -आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. तातडीच्या कामामुळे तुमची योजना बारगळेल, पण शेवटी जे झालं ते चांगल्यासाठीच, हे तुम्हाला जाणवेल. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.
advertisement
8/13
वृश्चिक राशी -आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येईल जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागेल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
9/13
धनु राशी - चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील - त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील. तुम्हाला नेहमी जे काम करायचे होते, ते काम करण्याची आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.
advertisement
10/13
मकर राशी -विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल. आज तुमचा शुभ अंक 9 आहे.
advertisement
11/13
कुंभ राशी -नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. आज कुणाला माहिती नसतांना आज तुमच्या घरात कुणी दूरच्या नातेवाइकांचे आगमन होऊ शकते. नवीन वस्तू किंवा वस्तू घेण्यासाठी आजचा दिवस शुभ राहील. राहिलेले कामे मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
12/13
मीन राशी -ज्या लोकांनी आपला पैसा शेअर मार्केटमध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाध आणू शकतात. नव्या कल्पनांची परीक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. जोडीदार आज तुमच्यावर खुश असेल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: गुरुवार गेमचेंजर ठरणार, क्षुल्लक चुकीमुळं पश्चातापाची वेळ येणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य