Gajkesari Yog 2026: गजकेसरी योग पुन्हा जुळतोय! नवीन वर्षाचा शुभारंभ जबरदस्त होणार, 3 राशीच्या लोकांना लाभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology New Year: काऊंटडाऊन सुरू झाला असून नवीन वर्ष 2026 सुरू व्हायला आता थोडाच वेळ उरला आहे. नवीन वर्षात कोणाला काय मिळेल याची प्रत्येकाला उत्सुकता आहेच, पण त्यातच नवीन वर्ष सुरू होताच एक खूप दुर्मीळ आणि शुभ संयोग जुळून येणार आहे.
advertisement
1/6

ज्योतिष शास्त्रानुसार, दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. या दिवशी दुपारी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल, तिथे गुरू आधीपासूनच विराजमान आहेत. अशा प्रकारे मिथुन राशीत या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी योग बनेल. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, वर्षाच्या सुरुवातीला तयार होणारा हा गजकेसरी योग 3 राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
advertisement
2/6
वृषभ रास - वर्षाच्या सुरुवातीला होणारा गजकेसरी योग वृषभ राशीवर 2026 मध्ये लक्ष्मी देवीची कृपा राहणार असल्याचे संकेत देत आहे. हा शुभ योग वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप नशीबवान बनवेल. आर्थिक आघाडीवर तुम्ही अधिक भक्कम व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीच्या संधी चालून येतील. कौटुंबिक सुख मिळेल आणि आरोग्यात सुधारणा होईल. समाजात मान-सन्मान वाढण्यासोबतच उत्पन्नातही चांगली वाढ होईल.
advertisement
3/6
मिथुन रास - गजकेसरी योग मिथुन राशीतच तयार होत आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा मिळू शकतो. नोकरीत असलेल्या लोकांची प्रगती किंवा प्रमोशन होईल. आर्थिक लाभ वाढल्यामुळे तुमची ओढगस्त कमी होईल. व्यापाऱ्यांसाठी नफा कमावण्याचे नवीन मार्ग खुले होतील.
advertisement
4/6
मिथुन राशीच्या लोकांची बोलण्याची पद्धत आणि तुमचे विचार लोकांना आकर्षित करतील. तुमच्या कल्पक कामाचं सगळीकडं कौतुक होईल. विवाहासाठी इच्छुकांना चांगले स्थळ मिळू शकते. एकूणच हा काळ तुमच्यासाठी सुख-समृद्धी आणि प्रगतीनं भरलेला असेल.
advertisement
5/6
तूळ रास - वर्षाच्या सुरुवातीला तयार होणारा गजकेसरी योग तूळ राशीच्या लोकांचं नशीब उजळवू शकतो. तुमची नशिबाची साथ अजूनच भक्कम होईल. हा शुभ योग तुमच्या करिअरमध्ये काही सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. पैसा, ऐश्वर्य आणि नात्यांच्या बाबतीत चांगले अनुभव येतील.
advertisement
6/6
तूळ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील आणि तुमच्या कष्टाचं कौतुक होईल. तुमचं पद, प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढण्याचे स्पष्ट संकेत आहेत. उत्पन्नात सतत सुधारणा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि एकमेकांमधील ताळमेळ चांगला राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Gajkesari Yog 2026: गजकेसरी योग पुन्हा जुळतोय! नवीन वर्षाचा शुभारंभ जबरदस्त होणार, 3 राशीच्या लोकांना लाभ