Numerology: ज्यांची लग्नं खूप दिवसांपासून होत नाहीयेत..! अंकशास्त्रातील साधा उपाय करून पाहा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marriage : सध्याच्या काळात लग्न जुळवणं मोठं मुश्कील काम झालं आहे. लग्नासाठी इच्छुक मुलांची संख्या मोठी आहे, वय निघून चाललं आहे पण, जोडीदार मिळत नाहीये. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. पण काहींच्या बाबतीत तर अशी परिस्थिती आहे की, सगळं काही ठीक असतानाही लग्न जुळता-जुळेना. यासाठी तुम्ही नक्की कशामुळे अडचण येत आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. अंकशास्त्र यावर काही उपाय सुचवतं, त्यामुळे तुम्हाला निराश होण्याची गरज नाही.
advertisement
1/6

अंकशास्त्रानुसार, एक छोटासा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही शुक्रवारी तुमच्या डाव्या तळहातावर एक छोटा उपाय केला, तर त्यानं तुमच्या विवाहाचे योग जुळून येण्यास चांगली मदत होऊ शकते. जाणून घेऊया हा उपाय कधी आणि कसा करायचा.
advertisement
2/6
लग्न जुळण्यासाठी करण्याचा सोपा उपाय -अंकशास्त्र म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाही, तर त्याचे परिणाम तुमच्या विश्वास आणि विचारांच्या शक्तीवरही अवलंबून असतात. अंकशास्त्रानुसार, शुक्रवारी डाव्या तळहातावर 6 अंक लिहावा. ज्या लोकांची लग्नं खूप दिवसांपासून होत नाहीयेत किंवा ठरत आलेलं काही कारणांनी अचानक फिस्कटतं, त्यांच्यासाठी हा उपाय लाभदायक मानला गेला आहे.
advertisement
3/6
6 आकड्याचे विशेष महत्त्व आहे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि चांगला जीवनसाथी मिळण्याचे योग निर्माण होतात. तज्ज्ञ सांगतात की, करायचा असल्यास हा उपाय पूर्ण विश्वासानं करावा. आपण कोणत्याही उपायाला विश्वासानं स्वीकारल्यास तेव्हा संपूर्ण ब्रह्मांडदेखील तुमच्यासाठी अनुकूल काम करू लागतं.
advertisement
4/6
अंक 6 कधी आणि कसा लिहायचा?या उपायासाठी शुक्रवारचा दिवस सर्वात शुभ मानला जातो, कारण हा अंक शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. सकाळी आंघोळ झाल्यावर गुलाबी, सोनेरी किंवा लाल रंगाच्या पेनने डाव्या हाताच्या अंगठ्याच्या खालील भागावर अंक 6 लिहावा. असं दर शुक्रवारी करावं आणि दिवसभर अनेक वेळा या अंकाकडे पाहावे. असं केल्यानं शुक्र ग्रहाची शक्ती वाढते आणि विवाहाचे योग लवकर जुळतात, असं मानलं जातं.
advertisement
5/6
अंक 6 चे महत्त्व आणि परिणाम -अंकशास्त्रामध्ये अंक 6 ला प्रेम, संतुलन, आकर्षण आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जाते. हा शुक्र ग्रहाचा अंक आहे, तो व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि सौंदर्य वाढवतो. ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो, ते रिलेशनमध्ये समाधानी आणि आनंदी राहतात. कमजोर शुक्रामुळे नात्यांमध्ये दुरावा आणि अस्थिरता येते. त्यामुळे अंक 6 ला अॅक्टिव करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
advertisement
6/6
शुक्र ग्रहाला अधिक मजबूत करण्यासाठी पांढऱ्या किंवा चमकदार रंगाचे कपडे घालावेत. तसेच, दूध, दही, पनीर आणि पांढऱ्या मिठाईचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा तुम्ही तुमच्या तळहातावर अंक 6 लिहिता, तेव्हा 'माझ्या आयुष्यात चांगलं स्थळ येत आहे', अशी सकारात्मक भावना मनात ठेवा. हाच सकारात्मक विचार तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: ज्यांची लग्नं खूप दिवसांपासून होत नाहीयेत..! अंकशास्त्रातील साधा उपाय करून पाहा