कधी हॉटेल रुम तर कधी स्विमींग पूल, YOU ARE NOT READY म्हणत Hardik Pandya ने शेअर केले गर्लफ्रेंडसोबतचे Unseen Photos
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. नताशा हिच्यासोबतच्या घस्फोटानंतर पुन्हा एकदा हार्दिक प्रेमात पडला.
advertisement
1/7

भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या मागील काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. नताशा हिच्यासोबतच्या घस्फोटानंतर पुन्हा एकदा हार्दिक प्रेमात पडला. नताशा आणि हार्दिक यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आम्ही विभक्त होत असल्याचे जाहीर केले.
advertisement
2/7
नताशा आणि हार्दिक पंंड्याला एक मुलगा असून दोघे मिळून त्याचा सांभाळ करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही दिवस डेट केल्यानंतर हार्दिक पंड्याने अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविकसोबत लग्न केले आणि लग्नाच्या काही वर्षातच घटस्फोट घेतला.
advertisement
3/7
पण भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या त्याची कथित गर्लंफ्रेंड माहिका शर्मासोबत वेळ घालवताना दिसून येतोय.
advertisement
4/7
गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर हार्दिक मॉडेल माहिका शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघे मालदीवला जाताना स्पॉट झाली. हार्दिक पंड्याने आपला वाढदिवस माहिका शर्मा हिच्यासोबत मालदीवमध्ये साजरा केला. या वाढदिवसाचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. हार्दिक पंड्या सतत माहिका शर्मा हिच्यासोबत स्पॉट होताना दिसतोय.
advertisement
5/7
हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच आशिया चषक संपल्यानंतर हार्दिक पांड्याने माहिका शर्मासोबतचे फोटोही शेअर केले होते. आता धुरंधर चित्रपटातील गाणं शेअर करत हार्दिक पांड्याने 20 फोटो शेअर केले आहेत.
advertisement
6/7
Ladies And Gentlemen You Are Not Ready For This अशा या गाण्याची सुरुवात आहे. हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासह मुलगा अगस्त्य आणि माहिका शर्माचेही फोटो आहेत.
advertisement
7/7
काही फोटोंमध्ये हार्दिक आणि माहिका एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. यादरम्यान आठवणीने हार्दिक पंड्या याने मुलगा अगस्त्य याचेही फोटो शेअर केले. गर्लफ्रेंड माहिका हिच्यासोबत असताना देखील हार्दिक पंड्याला मुलाची आठवण येत असल्याचे फोटोवरून दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
कधी हॉटेल रुम तर कधी स्विमींग पूल, YOU ARE NOT READY म्हणत Hardik Pandya ने शेअर केले गर्लफ्रेंडसोबतचे Unseen Photos