Suraj Chavan Wife : 'मीच त्यांची होणारी बायको' म्हणत अखेर समोर आली सूरज चव्हाणची लाईफ पार्टनर, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan Wife : रील स्टार आणि बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणच्या बायकोचा चेहरा अखेर सर्वांसमोर आलाय. कोण आहे सूरज चव्हाणची बायको, कशी दिसते? पाहिलं का!
advertisement
1/10

बिग बॉस मराठी 5 चा विजेता आणि प्रसिद्ध रील स्टार सूरज चव्हाण मागील काही महिन्यांपासून चर्चेत आहे. बिग बॉसनंतर सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' या मराठी सिनेमात दिसला. हा सिनेमा फार चालला नाही पण सूरज चव्हाणचं मोठ्या पडद्यावर दिसण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
advertisement
2/10
दरम्यान सूरज चव्हाण लग्न करतोय अशी बातमी आली. स्वत: सूरजनं देखील त्याचं लग्न ठरल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सूरजची होणारी बायको नेमकी आहे तरी कोण असा प्रश्न तमाम महाराष्ट्राला पडला होता.
advertisement
3/10
सूरज चव्हाणची होणारी बायको कोण कशी दिसते हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना होती. सूरजने अनेकदा त्याच्या रीलमधून त्याच्या होणाऱ्या बायकोचा सस्पेन्स वाढवला होता. पण अखेर सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा सर्वांसमोर आला आहे.
advertisement
4/10
येत्या काही दिवसांत सूरज चव्हाणचं लग्न होणार आहे. त्याचं बारामतीमधील घर देखील तयार झालं आहे. नव्या घरात सूरज चव्हाणच्या बायकोचा गृहप्रवेश होणार आहे.
advertisement
5/10
दरम्यान सूरज चव्हाणची बहिण अंकिता वालावलकर हिने सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा सर्वांसमोर आणला.
advertisement
6/10
सूरज चव्हाण आणि त्याच्या होणाऱ्या बायकोचं अंकिताने नुकतंच केळवण केलं. केळवणाचा व्हिडीओ अंकिताने शेअर केला आहे.
advertisement
7/10
संजना असं सूरज चव्हाणच्या बायकोचं नाव आहे. संजना देखील सूरज सारखीच साधी असल्याचं दिसतंय. अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती कॅमेरासमोर येताना ऑकवर्ड आणि लाजताना दिसत आहे.
advertisement
8/10
अंकिताने दोघांच्या केळवणासाठी फक्कड बेत बनवला होता. तिने दोघांचं औक्षण केलं आणि दोघांना खास भेटवस्तूही दिल्या.
advertisement
9/10
जेवणाआधी सूरज आणि संजना यांनी एकमेकांना घास भरवला. घास भरवताना दोघांनी हटके उखाणे देखील घेतली. सूरज म्हणाला, "बिग बॉस जिंकून पूर्ण झालं माझं स्वप्न, संजनाचं नाव घेतो, बोललो होतो ना, आधी करिअर मग लग्न!"
advertisement
10/10
संजनानेही उखाणा घेतला. ती म्हणाली, "बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको, सुरजचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan Wife : 'मीच त्यांची होणारी बायको' म्हणत अखेर समोर आली सूरज चव्हाणची लाईफ पार्टनर, PHOTO