August 2025 Rashifal: ऑगस्टमध्ये पैशांचा ढीग लावणार 4 राशींचे लोक; बुध-शुक्र-सूर्याकडून तिहेरी धनवर्षाव
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
August 2025 Rashifal: ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिना धमाकेदार ठरणार आहे. ऑगस्टमध्ये सूर्य, बुध, शुक्र इत्यादी ग्रहांचे संक्रमण विशेष शुभ योग निर्माण करत आहे, त्यामुळे वृषभ राशीसह ४ राशीच्या लोकांना भरपूर फायदा होईल. ऑगस्टमध्ये ग्रहांचे गोचर काही राशींच्या पथ्यावर पडणार असून भरपूर पैसा कमाई होऊ शकते.
advertisement
1/6

२०२५ सालचा आठवा महिना सुरू होणार असून त्यात अनेक मोठे ग्रह संक्रमण होत आहे. ग्रहांचा राजा सूर्य एका वर्षानंतर आपल्या स्वराशी म्हणजे सिंह राशीत संक्रमण करेल. बुध आणि शुक्र देखील राशी बदलतील.
advertisement
2/6
ऑगस्ट २०२५ मध्ये धनयोग - ऑगस्टमध्ये ग्रहांची स्थिती अनेक शुभ योग निर्माण करत आहे, ज्यामुळे ४ राशीच्या लोकांना भरपूर संपत्ती मिळेल. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यातील भाग्यवान राशी जाणून घेऊ.
advertisement
3/6
वृषभ - ऑगस्ट महिना वृषभ राशीच्या लोकांना श्रीमंत बनवण्यासाठी पूरक आहे. विशेषतः शुक्र राशीच्या परिवर्तनामुळे तुम्हाला पैसे मिळतील. तुमचे अडकलेले पैसे आता मिळतील. आर्थिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. समाजात, घरात आदर वाढेल.
advertisement
4/6
मिथुन - ऑगस्ट महिन्यात मिथुन राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात फायदा होईल. तुमच्या कारकिर्दीत चांगली प्रगती होईल. कामात तुम्हाला नवीन संधी मिळतील, ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. वेळोवळी आर्थिक लाभ होईल, वेळ चांगला जाईल.
advertisement
5/6
सिंह - सिंह राशीच्या लोकांना शनिच्या अडीचकीचा सामना करावा लागत आहे. परंतु, ऑगस्टमध्ये सूर्य स्वतःच्या राशीत सिंह राशीत भ्रमण करेल त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा देऊ शकतो. उत्पन्नातही वाढ होईल, तुम्ही गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता.
advertisement
6/6
धनु- शनिची अडीचकी धनु राशीवरही सुरू आहे, परंतु ऑगस्ट महिना त्यांच्यासाठी दिलासादायक ठरू शकतो. गुरु आणि शुक्र तुमचे उत्पन्न वाढवू शकतात. तुम्हाला तुमच्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. आरोग्य समस्या दूर होतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
August 2025 Rashifal: ऑगस्टमध्ये पैशांचा ढीग लावणार 4 राशींचे लोक; बुध-शुक्र-सूर्याकडून तिहेरी धनवर्षाव