Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Baba Vanga 2026 Predictions for zodiac signs: बाबा वेंगा यांची वर्ष २०२६ साठीची भविष्यवाणी सोशल मीडियावर चर्चेत आहे. यातल्या अनेक भविष्यवाण्या काळजाला हेलावून टाकणाऱ्या असल्या तरी एक भविष्यवाणी अशी आहे, जी ऐकून लोक आनंदाने नाचू लागतील. या भविष्यवाणीमध्ये वर्ष २०२६ मध्ये करोडपती होणाऱ्या राशींविषयी सांगितलं आहे.
advertisement
1/7

बल्गेरियाच्या भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच व्हायरल होऊ लागली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे, बाबा वेंगा यांनी २०२५ साठी केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या होत्या. आता २०२६ मध्ये आर्थिक संकट येण्याची धोकादायक भविष्यवाणी चर्चेत आहे. मात्र, एक दिलासा देणारी भविष्यवाणीही आहे.
advertisement
2/7
२०२६ मध्ये ५ राशी बनतील करोडपती- बाबा वेंगा यांच्या व्हायरल होत असलेल्या भविष्यवाणीनुसार, २०२६ मध्ये ५ राशींचे लोक करोडपती बनू शकतात. येणारे नवीन वर्ष या राशींसाठी अत्यंत भाग्यवान (लकी) ठरू शकते. जाणून घेऊया की बाबा वेंगा यांच्या मते २०२६ च्या लकी राशी कोणत्या आहेत.
advertisement
3/7
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी २०२६ हे वर्ष खूप शुभ असणार आहे. या लोकांना अनपेक्षित यश आणि धन-संपत्ती मिळण्याचे योग आहेत. कमाईत जबरदस्त वाढ होईल. नवीन वर्ष तुमच्या बँक बॅलन्सला मोठी वाढ देईल, असा अंदाज आहे.
advertisement
4/7
सिंह- सिंह राशीच्या लोकांवर शनीची अडीचकी उतरणीवर असेल. त्यामुळे समस्यांपासून दिलासा मिळेल. आर्थिक प्रगती होण्याचे योग आहेत. राजकारण आणि शासन-प्रशासनात सक्रिय असलेल्या लोकांचे पद आणि प्रभाव वाढेल.
advertisement
5/7
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी २०२६ हे वर्ष शुभ-लाभ सिद्ध होऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात चांगला लाभ होईल. व्यापाराचा विस्तार करण्याच्या योजना यशस्वी होतील. धन कमवाल आणि त्याची बचत करण्यातही यशस्वी व्हाल.
advertisement
6/7
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांचे २०२६ मध्ये उत्पन्न वाढेल. कामात पदोन्नती मिळण्याची प्रतीक्षा संपेल. अनपेक्षित धन मिळू शकते. व्यावसायिक लोकांसाठीही वेळ खूप लाभदायक आहे.
advertisement
7/7
मकर - मकर राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेमुळे करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. अनेक मकर राशीचे जे लोक दीर्घकाळापासून संघर्ष करत होते, आता त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ आर्थिक समृद्धी आणि मान-सन्मानाच्या रूपात मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक