Baba Vanga Predictions: या 3 राशींचा सुरू झाला गोल्डन टाइम..! बाबा वेंगाची भविष्यवाणी जशीच्या तशी, धनवर्षाव
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Baba Venga Predictions: जगप्रसिद्ध ज्योतिषी आणि भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांचे नाव पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जुलै ते डिसेंबर २०२५ या सहामाहीसाठी त्यांनी केलेली भाकिते ज्योतिषांमध्ये खूप उत्सुकता निर्माण करत आहेत. त्यांच्या भाकितांनुसार, या वर्षी उरलेल्या सहा महिन्यात तीन राशींना नशिबाची साथ, यश आणि करिअरमध्ये वाढ एकत्रच मिळेल. बाबा वेंगाच्या मते या भाग्यवान राशींना स्थिरता, आर्थिक प्रगती आणि नवीन संधी मिळतील. जाणून घेऊया त्या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
1/7

कुंभ: शनीच्या अधिपत्याखाली असलेली कुंभ रास २०२५ च्या उत्तरार्धात सर्वात लकी रास असेल. १३ जुलै रोजी वक्री शनी त्यांच्या कारकिर्दीत मोठे बदल घडवून आणेल. राहूने मे २०२५ मध्ये कुंभ राशीत प्रवेश केल्यानं हे दुर्मीळ ग्रह संयोजन सगळ्या गोष्टींमध्ये अनपेक्षित वाढ देईल. कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचाराचे असतात, या वर्षी त्यांच्या प्रतिभेला बक्षीस मिळेल. कुंभेची विचारसरणी त्यांना व्यवसाय किंवा सर्जनशील क्षेत्रात मोठे यश मिळवून देईल.
advertisement
2/7
२०२५ चा उत्तरार्ध कुंभेच्या लोकांसाठी नवीन दरवाजे उघडेल, ज्यामुळे त्यांना नाव, प्रसिद्धी आणि आर्थिक स्थिरता मिळेल. पण या राशीच्या लोकांनी त्यांनी त्यांचे मार्ग बदलू नयेत. त्यांनी नेहमी जसे वागले तसेच वागले पाहिजे. त्यांच्या या गुणामुळे त्यांना फायदा होईल.
advertisement
3/7
वृषभ: २०२५ च्या दुसऱ्या भागात शुक्र वृषभ राशीला पूर्ण पाठिंबा देईल. त्यामुळे या वर्षी त्यांचे जीवन अत्यंत शांत आणि यशस्वी होईल. गेल्या काही वर्षांत त्यांनी ज्या अडचणींचा सामना केला आहे, त्या या वर्षी जूनपासून पूर्णपणे संपतील. आतापासून त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि शांती येईल. वृषभ राशीचे व्यावहारिक विचार आणि समर्पण या वर्षाच्या दुसऱ्या भागात चांगले परिणाम देईल.
advertisement
4/7
वृषभ - शुक्राच्या पाठिंब्याने पैसे मिळवतील, करिअरमध्ये प्रगती करतील. मागील कठोर परिश्रमाचे परिणाम आनंद घेण्यासाठी आणि दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी योजना आखण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. तथापि, इतरांकडून सल्ला घेताना, त्यांनी त्यावर लगेच कृती करण्याऐवजी विचारपूर्वक योजना करावी.
advertisement
5/7
सिंह: सूर्य स्वामी असल्यानं २०२५ च्या दुसऱ्या भागात सिंह राशीला शक्तिशाली बदल दिसतील. गुरू आणि मंगळाच्या युतीमुळे या राशीचे लोक अभूतपूर्व प्रगती करतील. मंगळ आवश्यक ऊर्जा, धैर्य आणि प्रेरणा देईल, ज्यामुळे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढेल. संपत्ती मिळवण्याच्या उत्तम शक्यता आहेत.
advertisement
6/7
सिंह राशीच्या लोकांना नवीन संबंध, व्यावसायिक जीवनात ओळख मिळण्याची शक्यता आहे. २०२५ चा उर्वरित काळ कामात स्पष्टता आणि उद्देश देईल. धैर्यानं ध्येय गाठण्यासाठी आणि वैयक्तिक आणि आर्थिक यशाचा आनंद घेण्यासाठी हा योग्य वेळ आहे. तथापि, त्यांनी अतिआत्मविश्वास टाळावा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
advertisement
7/7
बाबा वेंगा कोण होत्या?भविष्यवेत्या बाबा वेंगा यांनी त्यांच्या जीवनात अनेक भविष्यवाण्या केल्या, ज्यामध्ये नैसर्गिक आपत्त्या, राजकीय घडामोडी आणि जागतिक बदलांचा समावेश होता. त्यांच्या काही प्रसिद्ध भविष्यवाण्यांमध्ये ९/११ चा हल्ला, सोव्हिएत युनियनचे पतन, २०२० मधील कोरोना महामारी आणि २००४ मधील सुनामी यांचा समावेश आहे, ज्या खऱ्या ठरल्या असे मानले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Baba Vanga Predictions: या 3 राशींचा सुरू झाला गोल्डन टाइम..! बाबा वेंगाची भविष्यवाणी जशीच्या तशी, धनवर्षाव