TRENDING:

Chandra Grahan 2026: आज संध्याकाळीच दिसणार 'ब्लड मून'; या 4 राशींवर सर्वाधिक वाईट वेळ येण्याचा धोका

Last Updated:
Chandra Astrology आजचा दिवस ज्योतिष आणि खगोलीयदृष्ट्या खास आहे. आज संध्याकाळी आकाशात एक खास खगोलीय दृश्य पाहायला मिळणार आहे. पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान चंद्र लाल रंगाचा दिसेल, ज्याला आपण 'ब्लड मून' म्हणतो. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा तिची सावली चंद्रावर पडते आणि त्यामुळे चंद्राचा रंग तांबूस किंवा लाल दिसतो.
advertisement
1/5
आज संध्याकाळीच दिसणार 'ब्लड मून'; या 4 राशींवर सर्वाधिक वाईट वेळ येण्याचा धोका
ज्योतिषशास्त्रानुसार, अशा प्रकारचा 'ब्लड मून' आपल्या मन आणि भावनांवर काहीसा गूढ परिणाम करतो. चंद्र मनाचा कारक असल्यानं लोक जास्त विचार करू लागतात आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात मानसिक दडपण अनुभवू शकतात. हे ग्रहण सिंह राशीत लागत आहे, जी रास जबाबदारी आणि शिस्तीसाठी ओळखली जाते. या ब्लड मूनचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या राशींवर होईल ते जाणून घेऊया.
advertisement
2/5
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ विचार करण्याच्या आणि बोलण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणणारा असेल. तुमच्यात एक नवीन जिज्ञासा निर्माण होईल आणि तुम्ही गोष्टींच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न कराल. नात्यांमध्ये संवाद साधण्याची पद्धत बदलू शकते, ज्यामुळे काही जुनी नाती अधिक घट्ट होतील, तर काहींमध्ये दुरावा येऊ शकतो. नवीन अनुभव तुमच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यास मदत करतील.
advertisement
3/5
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी ही वेळ आत्मचिंतनाची आहे. प्रत्येक गोष्ट अचूक परफेक्ट करण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुम्ही स्वतःवर कामाचा ताण घेऊ शकता. हे ग्रहण तुम्हाला शिकवेल की प्रत्येक वेळी सगळंच परफेक्ट असण्याची गरज नसते. स्वतःला थोडा मानसिक आराम द्या आणि जसे आहात तसे स्वतःचा स्वीकार करा, यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
advertisement
4/5
धनू - धनू राशीच्या लोकांसाठी हा काळ आपल्या विचारांना आणि नात्यांना एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्याचा संकेत देतो. तुम्ही भविष्यासाठी नवीन योजना आखू शकता. तुमचे काही जुने विचार बदलून तुम्ही अधिक व्यवहार्य विचार करू लागाल. मित्र आणि जवळच्या व्यक्तींसोबतच्या संबंधांमध्ये एक नवीन समज विकसित होईल.
advertisement
5/5
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी ही वेळ आध्यात्मिक प्रगतीची आहे. तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू शकाल आणि त्यानुसार निर्णय घ्याल. भावनिक संतुलन राखण्यासाठी ही चांगली वेळ आहे. आपल्या जीवनातील उद्देश आणि नात्यांना तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल, ज्यामुळे मनाला शांती आणि स्थिरता लाभेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Chandra Grahan 2026: आज संध्याकाळीच दिसणार 'ब्लड मून'; या 4 राशींवर सर्वाधिक वाईट वेळ येण्याचा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल