TRENDING:

Diwali 2025: दिवाळीत 100 वर्षांनी असा योगायोग! नशीब चमकण्याची वेळ आता या राशीच्या लोकांची

Last Updated:
Diwali 2025 Astrology: ज्योतिष्यांच्या मते यंदाची दिवाळी खूप दुर्मिळ मानली जात आहे. कारण, तब्बल १०० वर्षांनंतर या दिवाळीला त्रिग्रही योग आणि महालक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. त्याचबरोबर, दिवाळीच्या दिवशी पूजेसाठी प्रदोष काल आणि वृषभ काल हे शुभ मुहूर्तही प्राप्त होतील.
advertisement
1/6
दिवाळीत 100 वर्षांनी असा योगायोग! नशीब चमकण्याची वेळ आता या राशीच्या लोकांची
यावर्षी दिवाळीचा सण २० ऑक्टोबर २०२५, सोमवारी साजरा केला जाईल. या विशेष दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या पूजा विधान सांगितलं आहे. ज्योतिष्यांच्या मते, यावेळचा दिवाळीचा सण खूप खास असणार आहे, कारण सुमारे १०० वर्षांनंतर दिवाळीच्या दिवशी तूळ राशीत चंद्र आणि मंगळाची युती होत आहे, ज्यामुळे महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होईल.
advertisement
2/6
ज्योतिष जाणकारांच्या मते, महालक्ष्मी राजयोगासारख्या दुर्मिळ योगामुळे काही राशींच्या जीवनात धन, यश आणि सौभाग्य प्राप्त होतं. दिवाळीला तयार होत असलेल्या महालक्ष्मी राजयोगामुळे कोणत्या राशींचे नशीब पालटणार आहे, जाणून घेऊया.
advertisement
3/6
कर्क (Cancer) - या दिवाळीला महालक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी धनवृद्धी आणि नवीन संधींचे संकेत घेऊन आला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक बोनस किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. घरात एखादे शुभ कार्य होण्याचा योग तयार होत आहे. नात्यांमध्येही गोडवा वाढेल आणि जुने मतभेद दूर होतील. या दिवाळीला माता लक्ष्मीला कमळाची फुले अर्पण करा, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिरता कायम राहील.
advertisement
4/6
मकर (Capricorn) - मकर राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी लाभ आणि मान-सन्मान घेऊन येईल. जे लोक सरकारी नोकरीची किंवा पदोन्नतीची वाट पाहत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्याला गांभीर्याने घेतलं जाईल. नवीन भागीदारीत फायदा होईल. लक्ष्मीपूजनाच्या वेळी पांढरे वस्त्र परिधान करा, यामुळे तुमच्या जीवनात सौभाग्य वाढेल.
advertisement
5/6
कन्या (Virgo) - महालक्ष्मी राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे धनप्राप्तीचा योग बनत आहे. जे लोक व्यवसाय करतात, त्यांना परदेशी ग्राहकांकडून लाभ मिळेल. तुमच्या जोडीदाराचे नशीबही तुमच्या प्रगतीसाठी सहायक ठरेल. मानसिक शांतीसाठी या दिवशी काळ्या तिळाचा दिवा लावा. त्याचबरोबर आपल्या घराच्या उत्तर दिशेला शंख ठेवा, ज्यामुळे धनवृद्धीचे दरवाजे उघडतील.
advertisement
6/6
काय असतो महालक्ष्मी राजयोग? - हा योग चंद्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे तयार होतो. महालक्ष्मी राजयोग हा एक खूप शुभ योग आहे, जो व्यक्तीला अपार धन, सुख, समृद्धी, मान-सन्मान आणि यश देतो. ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग तयार होतो, त्यांचे जीवन सुख-सुविधांनी परिपूर्ण असते आणि त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Diwali 2025: दिवाळीत 100 वर्षांनी असा योगायोग! नशीब चमकण्याची वेळ आता या राशीच्या लोकांची
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल