Dhanteras 2025: आपल्या घरची लक्ष्मी घालवण्यासारखं..! धनत्रयोदशीला घरातील या वस्तू कोणालाही देण्याचं टाळा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dhanteras 2025: धनत्रयोदशीचा सण सुख-समृद्धीचा मानला जातो. यंदा धनत्रयोदशी १८ ऑक्टोबर, शनिवारी साजरी केली जाईल. पंचांगानुसार, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला हा सण साजरा होतो. या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर देव यांच्यासह भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते.
advertisement
1/6

ज्योतिष अभ्यासकांच्या मते, या दिवशी सुख-समृद्धीसाठी छोटे छोटे उपाय करणे खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर, वास्तुशास्त्रानुसार, या दिवशी घरातील काही वस्तू कोणालाही उसण्या देणं अत्यंत अशुभ मानलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी उधार देऊ नयेत, याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/6
१. मीठ (नमक)धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ उधार देणं चांगलं मानले जात नाही. साधारणपणे मीठ आपल्या स्वयंपाकघरातील अविभाज्य वस्तू असते, पण ज्योतिषशास्त्रात याचे मोठे महत्त्व सांगितले आहे. मीठ राहू ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणारे तत्व देखील आहे.
advertisement
3/6
धनत्रयोदशी किंवा दिवाळीच्या दिवसांमध्ये एखाद्याला मीठ उसणं देणं म्हणजे, नकळतपणे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थिरता दुसऱ्याला देण्याप्रमाणं आहे. असं केल्यानं घरातील बरकत कमी होऊ शकते. त्यामुळे, या शुभ दिवसांमध्ये मीठ न देणेच योग्य मानले जाते.
advertisement
4/6
पांढऱ्या वस्तूधनत्रयोदशीच्या दिवशी दूध, दही आणि साखर यांसारख्या पांढऱ्या वस्तू देखील उधार देऊ नयेत. वास्तुशास्त्रानुसार, दूध आणि दही यांचा संबंध चंद्र-शुक्र यांच्याशी असतो, त्याला सुख-समृद्धीचा कारक मानले जाते. तसेच, साखर आनंदाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे, या दिवशी पांढऱ्या वस्तू उधार देणे खूपच अशुभ आहे.
advertisement
5/6
३. तेल - धनत्रयोदशीच्या दिवशी तेल उधार देणे देखील अत्यंत अशुभ मानले जाते. असे म्हणतात की तेलाचा संबंध शनीशी असतो, तेल उधार दिल्यानं घरात आर्थिक अडचणी येऊ शकतात. याशिवाय, या दिवशी धारदार वस्तू आणि टोकदार वस्तू देखील उसण्या देऊ नयेत.
advertisement
6/6
४. धन किंवा पैसा - धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही पैसे उधार देऊ नयेत. धनत्रयोदशीला कोणाला पैसे उधार देऊ नयेत, यामुळे तर घरातील लक्ष्मीला बाहेर घालवण्यासारखं आहे. असं केल्यानं वर्षभर पैशांचा टिकाव राहत नाही आणि पैसे हातात येतात न येतात तोच खर्च होतात किंवा निघून जातात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Dhanteras 2025: आपल्या घरची लक्ष्मी घालवण्यासारखं..! धनत्रयोदशीला घरातील या वस्तू कोणालाही देण्याचं टाळा