TRENDING:

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात या 5 राशी; यंदाच्या दिवाळीत होऊ शकतात मालामाल

Last Updated:
Diwali Horoscope: २० ऑक्टोबरला दिव्यांचा दिवाळीचा सण साजरा केला जाईल. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात, माता लक्ष्मीला समृद्धी आणि धनाची देवी मानलं जातं. दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीची पूजा केल्यानं घरात पैशाची आवक वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार, माता लक्ष्मी पाच राशींच्या लोकांवर विशेष कृपा करते. जाणून घेऊया त्या पाच राशी कोणत्या आहेत, ज्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते.
advertisement
1/5
देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात या 5 राशी; यंदाच्या दिवाळीत होऊ शकतात मालामाल
वृषभ रास: वृषभ रास पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. या राशीचे स्वामी ग्रह शुक्र आहेत, या राशीचे लोक धैर्यवान, मेहनती आणि स्थिर असतात. शुक्र ग्रहाने प्रभावित असलेल्या व्यक्तींवर माता लक्ष्मी विशेषतः मेहरबान असते. या राशीचे मेहनत करणारे लोक जीवनात खूप प्रगती करतात.
advertisement
2/5
कन्या रास: कन्या रास ही राशीचक्रातील सहावी रास आहे आणि ती पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. या राशीचे लोक मेहनती, विश्वासार्ह आणि सांघिक कार्यात विश्वास ठेवणारे असतात. माता लक्ष्मी त्यांच्या जीवनात कधीही धन-दौलताची कमी होऊ देत नाही आणि त्यांच्या मेहनतीला फळदायी बनवते.
advertisement
3/5
तूळ रास: राशीचक्रातील सातवी रास तूळ आहे, जी वायू तत्वातील रास आहे. या राशीचे स्वामी देखील शुक्र आहेत. या राशीचे लोक मेहनती असण्यासोबतच मनमिळाऊ, न्यायप्रिय, रचनात्मक आणि कलात्मक असतात. तूळ राशीच्या व्यक्तींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा असते.
advertisement
4/5
कुंभ रास: ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ रास राशीचक्रातील ११ वी रास आहे आणि ती वायू तत्वाशी संबंधित रास आहे. या राशीचे व्यक्ती आत्मनिर्भर, मेहनती, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि विचारशील असतात. या राशीच्या लोकांवरही माता लक्ष्मी कृपा करते.
advertisement
5/5
मीन रास: मीन रास जल तत्वातील रास आहे. या राशीचे स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत, जे धनाचे कारक ग्रह आहेत. वैदिक ज्योतिषानुसार, मीन राशीचे लोक दयाळू, करुणामय आणि कलात्मक असतात. त्यांचे हे गुण माता लक्ष्मीला विशेषतः आवडतात. त्यामुळे देवी लक्ष्मीची त्यांच्यावर नेहमी कृपा राहते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात या 5 राशी; यंदाच्या दिवाळीत होऊ शकतात मालामाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल