Besan Ladoo Recipe : दगडासारखे कडक होतायत बेसनाचे लाडू, मऊ आणि तोंडात ठेवताच विरघळणाऱ्या लाडूसाठी वापरा 'ही' खास ट्रिक!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
दिवाळीच्या फराळात बेसनाच्या लाडवांचा समावेश आवर्जून केला जातो. पण अनेकदा लाडू बनवताना काही छोट्या चुकांमुळे ते कडक होतात किंवा दातांना चिकटतात.
advertisement
1/7

दिवाळीच्या फराळात बेसनाच्या लाडवांचा समावेश आवर्जून केला जातो. पण अनेकदा लाडू बनवताना काही छोट्या चुकांमुळे ते कडक होतात किंवा दातांना चिकटतात. मऊ, लुसलुशीत आणि तोंडात ठेवताच विरघळणारे लाडू बनवण्यासाठी बेसनाचे प्रमाण, भाजण्याची पद्धत आणि मिश्रण थंड करण्याची प्रक्रिया योग्य असणे आवश्यक आहे.
advertisement
2/7
योग्य बेसन निवडा: लाडू बनवण्यासाठी नेहमी जाडसर किंवा रवाळ बेसन वापरा. बारीक बेसन वापरल्यास लाडू कडक आणि चिवट होतात. रवाळ बेसन बाजारात उपलब्ध नसेल, तर साध्या बेसनात थोडा बारीक रवा मिसळा.
advertisement
3/7
तूप आणि बेसनाचे प्रमाण: बेसनाच्या लाडवांची मऊकता तुपावर अवलंबून असते. लाडू कडक होऊ नयेत म्हणून तूप थोडे जास्त वापरा. साधारणपणे, 1 कप बेसनासाठी अर्धा कप ते पाऊण कप (1:0.5 किंवा 1:0.75) शुद्ध तूप वापरा. बेसनाचे मिश्रण भाजताना ते थोडे पातळ वाटले पाहिजे.
advertisement
4/7
मंद आचेवर भाजा: बेसन नेहमी मंद किंवा मध्यम-मंद आचेवरच भाजावे. बेसन भाजण्याची घाई करू नका. बेसनाला सोनेरी रंग येऊन सुगंधी वास येईपर्यंत भाजणे आवश्यक आहे. जर बेसनाचा रंग गडद झाला नाही आणि ते कच्चे राहिले, तर लाडू दातांना चिकटतात.
advertisement
5/7
'दाणेदार लाडूसाठी पाण्याची ट्रिक: बेसनाचा लाडू दाणेदार आणि मऊ होण्यासाठी, बेसन व्यवस्थित भाजून झाल्यावर गॅस बंद करा. त्यानंतर भाजलेल्या बेसनावर एक चमचा पाणी किंवा दुधाचे हबके मारा आणि लगेच ढवळून घ्या. यामुळे बेसन फुलते आणि लाडवाला दाणेदार टेक्सचर मिळते.
advertisement
6/7
पिठीसाखर घालण्यापूर्वी मिश्रण थंड करा: मिश्रण पूर्णपणे गार झाल्यावरच त्यात पिठीसाखर घाला. जर मिश्रण गरम असताना साखर घातली, तर साखर वितळते आणि बेसनाच्या मिश्रणाला पाणी सुटून लाडू कडक किंवा पातळ होऊ शकतात.
advertisement
7/7
तूप कमी पडल्यास 'हा' उपाय करा: जर लाडू वळताना मिश्रण कोरडे वाटत असेल आणि लाडू कडक होत असतील, तर गरम केलेले थोडे तूप त्या मिश्रणात मिसळून पुन्हा मळून घ्या. यामुळे लाडवांना बांधणी येते आणि ते मऊ होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Besan Ladoo Recipe : दगडासारखे कडक होतायत बेसनाचे लाडू, मऊ आणि तोंडात ठेवताच विरघळणाऱ्या लाडूसाठी वापरा 'ही' खास ट्रिक!