TRENDING:

कितीही मेहनत करा रिजल्ट 'झिरो', कष्ट करूनही 'या' मूलांकाच्या लोकांना मिळत नाही झटपट सक्सेस!

Last Updated:
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकावर एका विशिष्ट ग्रहाचा प्रभाव असतो. काही लोक जन्मतः नशीब घेऊन येतात, तर काहींना आयुष्यात साध्या गोष्टी मिळवण्यासाठीही प्रचंड संघर्ष करावा लागतो.
advertisement
1/7
कितीही मेहनत करा रिजल्ट 'झिरो', 'या' मूलांकाच्या लोकांना मिळत नाही सक्सेस!
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकावर एका विशिष्ट ग्रहाचा प्रभाव असतो. काही लोक जन्मतः नशीब घेऊन येतात, तर काहींना आयुष्यात साध्या गोष्टी मिळवण्यासाठीही प्रचंड संघर्ष करावा लागतो. ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 7 असतो. या मूलांकाचा स्वामी 'केतू' हा सावली ग्रह आहे.
advertisement
2/7
केतूचा अडथळा आणि विलंबाने यश: केतू हा ग्रह अध्यात्म आणि वैराग्याचा कारक आहे. भौतिक सुखाच्या बाबतीत हा ग्रह अनेकदा अडथळे निर्माण करतो. त्यामुळे मूलांक 7 च्या व्यक्तींनी कितीही मेहनत केली, तरी त्यांना त्याचे फळ उशिरा मिळते. वयाची 35 ते 40 वर्षे ओलांडल्यानंतरच त्यांच्या आयुष्यात खरी स्थिरता येते.
advertisement
3/7
कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही: या मूलांकाच्या लोकांना 'शॉर्टकट' कधीच यश देत नाही. त्यांना प्रत्येक कामात इतरांपेक्षा दुप्पट मेहनत करावी लागते. अनेकदा काम पूर्ण व्हायला आले असताना शेवटच्या क्षणी अडथळे येतात, ज्यामुळे त्यांना पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागते.
advertisement
4/7
मानसिक तणाव आणि एकटेपणा: केतूमुळे या व्यक्ती विचारांच्या जाळ्यात अडकतात. त्यांना खूप लवकर मानसिक थकवा येतो. जग त्यांच्या मेहनतीची कदर करत नाही, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते, ज्यामुळे ते अनेकदा एकटे पडतात.
advertisement
5/7
गूढ शास्त्र आणि संशोधनात प्रगती: जरी यांना भौतिक आयुष्यात संघर्ष करावा लागला, तरी बुद्धिमत्तेच्या जोरावर हे लोक कोणत्याही विषयात खोलवर जाऊ शकतात. शास्त्रज्ञ, लेखक, तत्त्वज्ञ किंवा ज्योतिष क्षेत्रात हे लोक अफाट मेहनत करून जगप्रसिद्ध होतात.
advertisement
6/7
फसवणुकीची भीती: या व्यक्ती स्वभावाने खूप प्रामाणिक असतात, पण केतूच्या प्रभावामुळे जवळचीच माणसे त्यांची फसवणूक करतात. आर्थिक व्यवहारात अनेकदा नुकसान सोसावे लागल्यामुळे त्यांचे मनोबल खचते.
advertisement
7/7
केतूचा प्रभाव रोखण्यासाठी उपाय: जर तुमची मेहनत वाया जात असेल, तर केतूचा प्रभाव शांत करणे गरजेचे आहे. यासाठी दररोज गणपतीची उपासना करणे सर्वात उत्तम मानले जाते. कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे आणि कपाळावर केशराचा टिळा लावल्याने भाग्योदय लवकर होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
कितीही मेहनत करा रिजल्ट 'झिरो', कष्ट करूनही 'या' मूलांकाच्या लोकांना मिळत नाही झटपट सक्सेस!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल