TRENDING:

Rinku Singh : दे सिक्स... दे फोर... रिंकू सिंगची तोडफोड, फक्त 15 मिनिटांमध्ये फिरवली अख्खी मॅच!

Last Updated:

विजय हजारे ट्रॉफीमध्ये रिंकू सिंगची बॅट शांत व्हायचं नाव घेत नाहीये. या हंगामात रिंकूने चौथ्यांदा 50+ स्कोअर केला, त्यामुळे उत्तर प्रदेशचा लागोपाठ सहावा विजय झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विजय हजारे ट्रॉफीमध्ये रिंकू सिंगची बॅट शांत व्हायचं नाव घेत नाहीये. या हंगामात रिंकूने चौथ्यांदा 50+ स्कोअर केला, त्यामुळे उत्तर प्रदेशचा लागोपाठ सहावा विजय झाला आहे. उत्तर प्रदेशने विदर्भाविरुद्धचा सामना 54 रननी जिंकला आणि क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. रिंकू सिंगने केवळ बॅटिंगमध्येच चमकदार कामगिरी केली नाही तर उत्कृष्ट कर्णधारपदही बजावले. उत्तर प्रदेशने विदर्भाला 340 रनचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाला 285 रनपर्यंतच मजल मारता आली.
दे सिक्स... दे फोर... रिंकू सिंगची तोडफोड, फक्त 15 मिनिटांमध्ये फिरवली अख्खी मॅच!
दे सिक्स... दे फोर... रिंकू सिंगची तोडफोड, फक्त 15 मिनिटांमध्ये फिरवली अख्खी मॅच!
advertisement

रिंकूची 190 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग

रिंकू सिंगने 190 च्या स्ट्राईक रेटने विदर्भाच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. रिंकूने अर्धशतक झळकावले पण नंतर त्याला रिटायर हर्ट व्हावे लागले. मैदान सोडण्यापूर्वी रिंकूने फक्त 30 बॉलमध्ये 57 रन केल्या. त्याच्या खेळीत चार फोर आणि दोन सिक्सचा समावेश होता. रिंकूच्या स्फोटक खेळीमुळे उत्तर प्रदेशला 300 रनचा टप्पा ओलांडण्यास मदत झाली. रिंकूचा हा हंगामातील चौथा 50+ स्कोअर होता. त्याने हैदराबादविरुद्ध 67 रन काढल्या, त्यानंतर चंदीगडविरुद्ध शतक ठोकले आणि बडोद्याविरुद्ध 63 रनची खेळी केली.

advertisement

उत्तर प्रदेशने पहिले बॅटिंग करताना 5 बाद 339 रन केल्या. ओपनर अभिषेक गोस्वामीने 103 रनची खेळी केली. त्यांना प्रियम गर्ग (67), ध्रुव जुरेल (56) आणि रिंकू सिंग (57) यांच्या जलद अर्धशतकांनी चांगली साथ दिली. अभिषेकने त्याच्या शतकात 10 फोर आणि दोन सिक्स मारले. ध्रुव जुरेलनेही पाच फोर आणि एक सिक्स मारून आपला डाव रंगवला. दरम्यान, प्रियमने त्याच्या डावात सहा फोर आणि तीन सिक्स मारले. लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाच्या अमन मोखाडेने लढाऊ 147 रन केल्या, पण विदर्भाला 50 ओव्हरमध्ये 9 बाद 285 रनच करता आल्या. उत्तर प्रदेशकडून कुलदीप यादवने 52 रनमध्ये तीन बळी घेतले. या विजयासह उत्तर प्रदेशने आपला अपराजित विक्रम कायम ठेवला आणि 24 पॉईंट्ससह टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि तुरीला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

विदर्भ, बंगाल आणि बडोदा यांचे प्रत्येकी 16 पॉईंट्स आहेत आणि त्यांचा एक सामना शिल्लक आहे. तिन्ही टीम उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याच्या शर्यतीत आहेत. अमेरिकेत जन्मलेल्या अमन रावच्या धमाकेदार नाबाद द्विशतकामुळे आधीच जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या हैदराबादने बंगालचा 107 रननी पराभव केला आणि त्यांच्या क्वार्टर फायनलच्या आशा धुळीस मिळाल्या. विष्णू सोलंकी (132) आणि प्रियांशु मोलिया (114) यांच्या शानदार शतकांमुळे बडोद्याने जम्मू आणि काश्मीरचा 76 रननी पराभव केला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rinku Singh : दे सिक्स... दे फोर... रिंकू सिंगची तोडफोड, फक्त 15 मिनिटांमध्ये फिरवली अख्खी मॅच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल