युजवेंद्र चहल आणि त्याची माजी पत्नी धनश्री वर्मा "द 50" या रिअॅलिटी शोमध्ये एकत्र दिसतील, अशी वृत्त समोर येत आहेत. पण, शोच्या निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे स्पर्धकांची यादी जाहीर केलेली नाही.
सलमान खानने "बिग बॉस" दरम्यान या शोबद्दल भाष्य केले होते, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश असेल. चहल आणि धनश्री एकत्र दिसले तर या शोमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. 'द 50' चा प्रीमियर 1 फेब्रुवारी रोजी भारतात होईल. हा शो सुरुवातीला रात्री 9 वाजता जिओहॉटस्टारवर प्रसारित होईल. त्यानंतर त्याचे थेट प्रक्षेपण कलर्सवर 10.30 वाजता होईल.
advertisement
2025 मध्ये चहल आणि धनश्रीचा घटस्फोट
लॉकडाऊन दरम्यान भारतीय स्पिन बॉलर युझवेंद्र चहल धनश्रीला भेटला. 2020 मध्ये त्यांचे लग्न झाले. धनश्री देखील चहलला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये जात असे. अचानक, 2024 मध्ये, दोघे वेगळे झाल्याची बातमी आली, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला.
अखेर, मार्च 2025 मध्ये दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले. घटस्फोटानंतर, चहल किंवा धनश्री वर्मा दोघांनीही त्यांचे नाते संपुष्टात येण्याचे कारण सांगितले नाही.
चहल आरजे महवशला करतोय डेट?
धनश्री वर्मापासून वेगळे झाल्यानंतर, युजवेंद्र चहल आरजे महवशसोबत दिसला. महवश चहलचे सामने पाहण्यासाठी अनेक वेळा स्टेडियममध्ये गेली, त्यामुळे दोघे डेट करत असल्याच्या अफवांना आणखी बळकटी मिळाली.
35 वर्षीय युजवेंद्र चहलने भारतासाठी 72 एकदिवसीय आणि 80 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, यात त्याने अनुक्रमे 121 आणि 96 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय (टी-20) सामना ऑगस्ट 2023 मध्ये खेळला होता.
