TRENDING:

Yearly Horoscope: वार्षिक राशीभविष्य! प्रयत्न-कष्टांचं शुभफळ; 2025 वर्ष या राशींना वरदान ठरणार

Last Updated:
Yearly Rashi Bhavishya In Marathi: कसं असेल वर्ष 2025, कोणत्या राशीला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा वार्षिक राशीभविष्य 2025
advertisement
1/12
वार्षिक राशीभविष्य! प्रयत्न-कष्टांचं शुभफळ; 2025 वर्ष या राशींना वरदान ठरणार
मेष (Aries): या वर्षी मेष राशीच्या व्यक्तींचं मनोबल उच्च राहील. मन उत्साही राहील, त्यामुळे तुम्ही सतत क्रियाशील राहाल. व्यापाऱ्यांसाठी हे वर्ष अनुकूल राहील. अनेक महत्त्वाची व्यावसायिक कामं पुढे नेण्यात यश मिळेल. व्यवसायात लाभ मिळण्याची स्थिती असेल. सरकारी किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष थोडं संमिश्र असेल; पण परिस्थिती प्रगतिशील राहील. मानसिक चढ-उतारांसह प्रगती होत राहील. रागावर नियंत्रण ठेवा. लॉटरी, शेअर्स आणि सट्टेबाजीशी संबंधित लोकांसाठी हे वर्ष मध्यम फलदायी राहील. जमीन-इमारत इत्यादी खरेदी-विक्रीसाठी हा काळ अनुकूल राहील. भावंडांशी जेमतेम समन्वय राहील. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार येतील. सावधगिरी बाळगा. मुलाच्या बाजूने अनुकूल परिस्थिती असेल. मुलाची प्रगती होईल. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये प्रगती होईल.
advertisement
2/12
वृषभ (Taurus): या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष थोडं संघर्षाचं असेल; पण संघर्षासोबतच प्रगतीदेखील होईल. मित्र आणि सहकाऱ्यांकडून सतत सहकार्य मिळेल. अनावश्यक वादांपासून दूर राहा. आरोग्याच्या किरकोळ समस्या असू शकतात. त्यावर मात करता येईल. आहाराची काळजी घ्यावी. तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची असेल तर वर्षाच्या सुरुवातीच्या तुलनेत शेवटच्या काही महिन्यांत शुभ परिस्थिती निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी वर्ष अनुकूल आहे. अभ्यासात मेहनत केली तर नक्कीच यश मिळेल. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल आणि सामाजिक प्रतिष्ठादेखील वाढेल. कोर्टाशी संबंधित वाद असल्यास तो मिटण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये थोडा तणाव असेल. त्यामुळे तणावाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराशी वाद होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी हे वर्ष अनुकूल राहील. थोडे कष्ट आणि संघर्ष केल्यास लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. नोकरदारांसाठी हे वर्ष शुभ आहे.
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : या राशीच्या व्यक्तींचं भाग्य चांगलं असेल. अनावश्यक पैसे खर्च करणं टाळावं. नाही तर आर्थिक दबाव येऊ शकतो. अधिक भांडवल गुंतवणुकीसाठी हे वर्ष फारसं अनुकूल नाही. अनावश्यक वाद टाळा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नातेवाईक आणि भावंडांशी समन्वय कमी होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठीही हे वर्षं थोडं संघर्षाचं असेल. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार असू शकतात; पण परस्पर समन्वय राखता येईल. वैवाहिक जीवनात काही तडजोड होऊ शकते. मुलांमुळेही काही तणाव सहन करावा लागू शकतो. मुलांशी अनेक विषयांवर वाद होऊ शकतो. शत्रूकडूनही त्रास होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. तुम्हाला लोकांचं सहकार्य मिळेल. व्यावसायिकांसाठी हे वर्ष संमिश्र असेल. मार्केटमध्ये हुशारीने पैसे गुंतवा.
advertisement
4/12
कर्क (Cancer) : या राशीच्या व्यक्तींना या वर्षी यशासाठी खूप संघर्ष करावा लागेल. मित्रांचं सहकार्य मिळेल. मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. बहुप्रतीक्षित वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. भावंडांचं सहकार्य मिळेल. रागाच्या भरात किंवा उत्साहात कोणतंही काम करू नये. संयम कमी होऊ शकतो. जमीन, वाहन, घर खरेदी-विक्री करायची असेल तर त्यासाठी परिस्थिती शुभ आहे. राजकारण्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. अभ्यासाची आवड निर्माण होईल. प्रवासाची संधी मिळेल. मुलांच्या समस्या कमी होतील. मोठ्या लोकांच्या मदतीने कामं यशस्वी होऊ शकतात. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष संमिश्र असेल.
advertisement
5/12
सिंह (Leo) : या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष लाभदायक असेल. लाभ मिळण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. कौटुंबिक सहकार्य आणि आनंद वाढेल. जवळचे मित्र आणि वडिलधाऱ्यांचं सहकार्य मिळेल. तब्येतही सुधारेल. कार्यक्षेत्रात कमी अडचणी येतील. लोकांचा पाठिंबा मिळत राहील. अडकलेले पैसे मिळतील. आर्थिक क्षेत्रात लाभाची परिस्थिती असेल. करमणुकीच्या साधनांची खरेदी-विक्री होईल. घरात सुखसोयी वाढतील. अनावश्यक वाद टाळा. मालमत्ता खरेदी करायची असेल तर हे वर्ष अनुकूल असेल. पालकांसह धार्मिक सहलीचं नियोजन करू शकता. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अतिशय अनुकूल आहे. अभ्यासात रस असेल. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी हे वर्ष चांगलं आहे. प्रेमसंबंधांमध्ये समन्वय वाढेल आणि संबंध सुधारतील. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत फिरण्याची संधी मिळू शकते. नोकरदारांसाठी हे वर्ष अतिशय अनुकूल आहे. लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. व्यावसायिक दृष्टिकोनातूनही वेळ अनुकूल आहे. व्यवसायात पैसे गुंतवल्यास फायदा होईल. धार्मिक कार्य करण्याची संधी मिळू शकते.
advertisement
6/12
कन्या (Virgo) : या वर्षी कन्या राशीची प्रगती थोडी मंद राहील; पण अनेक महत्त्वाची कामं पूर्ण होतील. आरोग्याबाबत काळजी घ्यावी. कारण आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. हे वर्ष सामान्य आणि आर्थिक बाबतीत संघर्षपूर्ण असू शकतं. जमीन आणि वास्तू खरेदी करण्याची शक्यता असली, तरी जास्त खर्च टाळा. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. नाही तर मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी हे वर्ष संमिश्र असेल. व्यावसायिकांसाठी हे वर्ष संघर्षपूर्ण असेल. विचार करूनच मार्केट आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवावेत. धार्मिक कार्याची आवड वाढेल. कोर्टाशी संबंधित कामांत मंद गतीने प्रगती होण्याची शक्यता आहे. खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी हे वर्ष थोडं अनुकूल असेल. तुम्हाला बोनस मिळू शकतो. कुटुंबातले मतभेद सुधारतील आणि सहकार्य वाढेल.
advertisement
7/12
तूळ (Libra) : या राशीच्या व्यक्तींना विचारपूर्वक काम करून प्रगती साधता येईल. काही मोठी कामंही पूर्ण होऊ शकतात. कमी अंतराचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. विचार करूनच एखाद्यावर विश्वास ठेवावा. नाही तर तणावाचा सामना करावा लागू शकतो. वाद टाळा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला भावंडांचं सहकार्य मिळाल्याने प्रगती होईल. मालमत्तेच्या खरेदी आणि विक्रीत फायदा होईल. आई-वडिलांशी स्नेह ठेवा. एखाद्या गोष्टीबद्दल मतभेद किंवा गोंधळ होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष थोडं संघर्षाचे असेल. मुलांकडून तुम्हाला संमिश्र सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. कोर्ट-कचेऱ्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये थोडा तणाव राहील. विरोधकांशी तडजोड किंवा मैत्री होऊ शकते. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष सर्वसाधारण राहील.
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : या राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष जवळपास अनुकूल असेल. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येतील. हे वर्ष बहुतांशी फायदेशीर आणि प्रगतीचं असेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. लाभाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रतिष्ठितांचं सहकार्य मिळेल. कोर्टाशी संबंधित प्रकरणांत प्रगती होईल. शिस्तबद्ध जीवन जगण्याची संधी मिळेल. यामुळे प्रगती करण्यात यश मिळेल. धार्मिक कार्याची आवड वाढेल. नोकरीच्या क्षेत्रात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वर्ष अनुकूल आहे. लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. नवीन व्यवसाय सुरू करणंदेखील फायदेशीर ठरेल.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : या वर्षी अनावश्यक धावपळ आणि कामात विलंब होऊ शकतो. कामं थांबू शकतात किंवा खोळंबा होऊ शकतो. अनावश्यक मानसिक त्रास आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो. जखम होणार नाही, याची काळजी घ्या. विरोधकांशी विनाकारण वाद घालू नका. कुटुंबात सुख-शांती राखण्याचा प्रयत्न करा. वर्षाचा मध्य थोडा संघर्षपूर्ण राहील. इकडे तिकडे धावपळ आणि खर्च जास्त होईल. वर्षाच्या मध्यानंतर उत्पन्नाचे स्रोत वाढतील. भावंडं आणि कुटुंबातल्या सदस्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे. आहाराची काळजी घ्या. जमीन, घर, वाहन खरेदी-विक्रीमध्ये काही अडचणी येण्याची शक्यता आहे. विवेकबुद्धीने काम करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. व्यावसायिकांसाठी हे वर्ष भरभराटीचे असेल. नोकरीत लाभदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
advertisement
10/12
मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. नोकरीत जागा बदलण्याची किंवा बदली होण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्याही उद्भवू शकतात. वागण्या-बोलण्यातून सामाजिक आदर वाढवण्यात यश मिळेल. आई-वडिलांकडून पाठिंबा आणि स्नेह मिळेल. प्रेमसंबंधांच्या क्षेत्रात थोडा संयम ठेवा. नाही तर मानसिक गोंधळाचा सामना करावा लागू शकतो. मुलांशीही भावनिक सुसंवाद ठेवा. वैवाहिक जीवनात वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पती-पत्नीने सामंजस्याने वागलं पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ संमिश्र असेल. अभ्यासात मेहनत केल्यानंतरच यश मिळू शकतं. व्यावसायिकांना संघर्ष करावा लागेल.
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : या वर्षी तुम्हाला मानसिक त्रास आणि अनावश्यक तणावाचा सामना करावा लागू शकतो. भौतिक सुखसोयींवर अवाजवी किंवा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. घरातल्या समस्या सोडवण्यात यश मिळेल. संयमाने आणि समजून घेऊन काम करा. मालमत्ता आणि वाहनांची खरेदी-विक्री करताना सावधगिरी बाळगा. मुलांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवनात पती-पत्नी थोडेसे उदासीन असू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगलं असेल. अभ्यासाची आवड वाढेल. व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. नोकरदार व्यक्तींवर थोडा दबाव असू शकतो. पत्नीच्या तब्येतीची काळजी वाटेल.
advertisement
12/12
मीन (Pisces) : मीन राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष अनुकूल असेल. मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरात शुभकार्यं होऊ शकतात. देश-विदेशात फिरण्याची संधी मिळू शकते. प्रयत्न केले तर परदेशातूनही फायदेशीर परिस्थिती निर्माण करता येईल. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास आर्थिक प्रगतीसोबतच मोठा फायदा होऊ शकते. संगीताची आवड वाढेल. भावंडांशी सुसंवाद वाढेल. कर्जाच्या व्यवहारातही अनुकूल परिस्थिती राहील. समाजात सन्मान वाढेल. मुलांच्या बाजूने अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. विरोधकांचा दबाव कमी होईल किंवा विरोधक पराभूत होतील. वैवाहिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. आरोग्यही अनुकूल राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल. शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तंना पदोन्नतीचा लाभ मिळू शकतो. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींसाठी हे वर्ष अनुकूल असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Yearly Horoscope: वार्षिक राशीभविष्य! प्रयत्न-कष्टांचं शुभफळ; 2025 वर्ष या राशींना वरदान ठरणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल