TRENDING:

Guru gochar 2025: गुरुकृपा दिवाळीतच होणार! केंद्र त्रिकोण योगात या राशींचे नशीब अनपेक्षित पालटणार

Last Updated:
Guru gochar 2025: धनत्रयोदशीचा सण उद्या १८ ऑक्टोबर रोजी देशभरात उत्साहात साजरा केला जाईल. धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी यांचे पूजन केले जाते, म्हणूनच या दिवसाला धन त्रयोदशी या नावानेही ओळखले जाते.
advertisement
1/6
गुरुकृपा दिवाळीतच होणार! केंद्र त्रिकोण योगात या राशींचे नशीब अनपेक्षित पालटणार
यावर्षीच्या पंचांगानुसार, धनत्रयोदशी खूपच खास मानली जात आहे, कारण या दिवशी गुरू (देवगुरू बृहस्पती) मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल. कर्क ही देवगुरू बृहस्पतीची उच्च रास आहे.
advertisement
2/6
ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, देवगुरू बृहस्पती तब्बल १२ वर्षांनंतर कर्क राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे केंद्र त्रिकोण योगाची निर्मिती होईल. तर, धनत्रयोदशीच्या दिवशी गुरूच्या या दुर्मिळ योगामुळे कोणत्या राशींवर माता लक्ष्मी आणि कुबेर देवतेची कृपा बरसणार आहे, जाणून घेऊया.
advertisement
3/6
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीचा सण विशेषतः शुभ ठरणा आहे. या काळात माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनात धनाचा ओघ वाढेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. अचानक धन लाभाचे योग तयार होत आहेत. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. अडलेल्या योजना यशस्वी होतील. व्यापाऱ्यांना विशेष लाभ मिळेल.
advertisement
4/6
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशीचा सण विशेषतः शुभ ठरेल. या दरम्यान माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबात सुख-समृद्धी वाढेल. समाजात मान-सन्मान मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी उन्नतीचे योग बनत आहेत आणि त्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो.
advertisement
5/6
वृश्चिक (Scorpio) वृश्चिक राशीच्या लोकांसाठी धनत्रयोदशी खूप खास मानली जात आहे. केंद्र त्रिकोण योगाच्या कृपेने त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. अनेक अडचणींमधून दिलासा मिळेल. व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. सोने खरेदी करणे त्यांच्यासाठी लाभदायक राहील.
advertisement
6/6
धनत्रयोदशीवर खरेदी करा या वस्तू: धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी, कुबेर यंत्र, धने, तांबे (तांब्याची भांडी), इतर भांडी, झाडू आणि श्री गणेश-माता लक्ष्मीची मूर्ती खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Guru gochar 2025: गुरुकृपा दिवाळीतच होणार! केंद्र त्रिकोण योगात या राशींचे नशीब अनपेक्षित पालटणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल