Holi 2026: होळी-शिमग्याला राहु-केतुसहित 4 ग्रहांची वक्री चाल! या 5 राशींचे आयुष्य पालटण्याचे योग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: आज होळी आणि उद्या धुलिवंदनचा सण आहे. ज्योतिषशास्त्राच्या नुसार यावेळची होळी खूपच खास मानली जात आहे. होळीला 4 मोठे ग्रह वक्री राहणार आहेत. पंचांगानुसार, होळीला मायावी ग्रह राहु, छाया ग्रह केतु, बुद्धीचा कारक बुध आणि देवगुरु बृहस्पती हे एकाच वेळी वक्री अवस्थेत पाहायला मिळतील. ज्योतिषशास्त्रानुसार, या सर्व ग्रहांचं एकत्र वक्री होणं प्रत्येक राशीवर मोठा प्रभाव पाडणारं असेल. पण, काही राशींसाठी हा काळ खूप शुभ आणि फायदेशीर ठरेल, ज्यामुळे त्यांच्या करिअर आणि बिझनेसमध्ये चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतील.
advertisement
1/6

वक्री होणं म्हणजे नेमकं काय?ज्योतिषशास्त्रात ग्रहाचं वक्री होणं म्हणजे त्या ग्रहाची उलटी चाल असं मानलं जातं. जेव्हा एखादा ग्रह वक्री अवस्थेत असतो, तेव्हा तो आपल्याला थांबून विचार करण्याचा संकेत देतो. ही वेळ अशी असते जेव्हा आपण अधुऱ्या राहिलेल्या कामांकडे पुन्हा लक्ष द्यायला हवं किंवा ज्यात सुधारणेची गरज आहे त्यावर काम करायला हवं. जर या काळात व्यक्तीने संयम ठेवला, विचारपूर्वक निर्णय घेतले आणि घाई टाळली, तर वक्री ग्रहांचा परिणाम पॉझिटिव्ह सुद्धा होऊ शकतो आणि आयुष्यात सुधारणा व्हायला मदत मिळते.
advertisement
2/6
वृषभ - या काळात आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा पाहायला मिळेल. आधी कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कामात स्थिरता येईल आणि बिझनेस करणाऱ्यांना जुन्या क्लाइंट्सकडून पुन्हा काम मिळू शकतं. कुटुंबातलं वातावरण चांगलं राहील, ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल.
advertisement
3/6
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी त्यांचे जुने ओळखीचे लोक किंवा कनेक्शन्स खूप उपयोगी पडतील. थांबलेले प्रोजेक्ट्स पुन्हा सुरू होऊ शकतात आणि अधुरी कामं मार्गी लागतील. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे प्रगतीचे रस्ते उघडतील. शिक्षण किंवा एखादं नवीन स्किल शिकण्यासाठी सुद्धा ही वेळ चांगली आहे.
advertisement
4/6
सिंह - राहु, केतु, गुरु आणि बुध यांच्या प्रभावामुळे नशिबाची साथ मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात. एखादी मोठी संधी अचानक समोर येऊ शकते. जे लोक खूप दिवसांपासून प्रमोशन किंवा ओळखीच्या प्रतीक्षेत होते, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. कुटुंब आणि इतर रिलेशनमध्ये सुद्धा चांगला सपोर्ट मिळेल.
advertisement
5/6
तूळ - या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादं रेंगाळलेलं काम पूर्ण होऊन फायदा देऊ शकतं. नात्यांमधील गैरसमज दूर होतील. लव्ह लाईफमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह बदल पाहायला मिळतील. क्रिएटिव्ह फील्डशी संबंधित लोकांसाठी ही वेळ खास फायदेशीर ठरेल.
advertisement
6/6
मकर - वक्री ग्रह मकर राशीच्या लोकांसाठी प्लॅनिंग करण्याची वेळ घेऊन आले आहेत. तुम्ही तुमचे फायनान्शियल निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकाल. अडकलेले पैसे मिळण्याचे योग आहेत आणि कामात हळूहळू यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्याचा पुढे जाऊन फायदा होईल. बिझनेसमध्ये सुद्धा चांगली ग्रोथ पाहायला मिळेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Holi 2026: होळी-शिमग्याला राहु-केतुसहित 4 ग्रहांची वक्री चाल! या 5 राशींचे आयुष्य पालटण्याचे योग