Numerology: अंकशास्त्रानुसार चांगला मोबाईल नंबर कसा निवडावा; अनेक अडचणी आपोआप टळतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mobile Numerology: आपल्यापैकी अनेकांना पटणार नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे, की आपण योग्य प्रकारचा मोबाइल नंबर निवडला, तर आपल्या अनेक समस्या सुटू शकतात. मोबाइल नंबर निवडण्याच्या प्रक्रियेत कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, त्याविषयी आज जाणून घेऊ.
advertisement
1/7

मोबाइल न्यूमरॉलॉजीसाठी 10 बेसिक टिप्स -मोबाइल नंबरची बेरीज हा फ्रेंडली अंक असला पाहिजे. चार, सात आणि आठ यांची बेरीज टाळली पाहिजे.
advertisement
2/7
अंकांची पुनरावृत्ती टाळणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामुळे ग्रहांच्या ताकदीवर परिणाम होतो. खासकरून जन्मतारखेतले शत्रू अंक समस्या निर्माण करू शकतात.
advertisement
3/7
एखादी व्यक्ती जीवनात शिक्षण, ज्ञान, वैयक्तिक आयुष्य, पैसा, स्टेटस यांपैकी कशाला प्राधान्य देते, त्यावरून त्याचा मोबाइल नंबर असावा.
advertisement
4/7
मोबाइल नंबरमधल्या अंकांची बेरीज फ्रेंडली असावी किंवा सायकिक नंबर आणि डेस्टिनी नंबर यांच्याशी न्यूट्रल असावी. तुमच्या मोबाइल नंबरमध्ये असे अंक हवेत, जे तुमच्या जन्मतारखेत थेट मिसिंग आहेत. त्यामुळे ग्रहांची जी शक्ती तुमच्या आयुष्यात नाहीये, ती मिळवण्यास मदत होईल.
advertisement
5/7
मोबाइल नंबरमधल्या सर्व अंकांची बेरीज करताना तुम्ही तुमच्या बिझनेसचं किंवा प्रोफेशनचं स्वरूपही लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक प्रकारच्या बिझनेससाठी आणि प्रोफेशनसाठी काही विशिष्ट अंक ठरलेले आहेत.
advertisement
6/7
बेरजेमध्ये 0 या अंकाच्या बेरजेकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. मोबाइलच्या स्टाइलपेक्षा मोबाइल नेटवर्कच्या उपयुक्ततेवर तुम्ही अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
advertisement
7/7
फॅन्सी व्हीआयपी नंबर्स काही गोष्टी अतिरिक्त स्वरूपात आणू शकतात आणि त्या बदल्यात अनेक बाबी घालवू शकतात. त्यामुळे प्रोफेशनल प्रगती, पैसा, संधी, अध्यात्म, कुटुंब, सोशल स्टेटस आदी बाबींमध्ये संतुलनासाठी असे फॅन्सी नंबर्स टाळा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: अंकशास्त्रानुसार चांगला मोबाईल नंबर कसा निवडावा; अनेक अडचणी आपोआप टळतात