Mangal Gochar 2026: प्रतिष्ठा धुळीस..! 4 राशींवर मोठं संकट; 48 तासात मंगळ-राहुची अभद्र युती जुळल्याबरोबर..
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mars Transit In Aquarius: दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:33 वाजता मंगळ शनीच्या मूळ त्रिकोणी, कुंभ राशीत संक्रमण करेल. राहू हा ग्रह कुंभ राशीत आधीच उपस्थित आहे, तो मिथुन राशीसह चार राशींसाठी अनुकूल नाही. या राशींना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात, आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. मानहानी होऊ शकते..
advertisement
1/7

मंगळ ग्रह येत्या 48 तासानंतर म्हणजे 23 फेब्रुवारीला सोमवारी मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ ही शनीची मूळत्रिकोण रास असून तिथे आधीच सूर्य, बुध, शुक्र आणि राहु विराजमान आहेत. अशा प्रकारे कुंभ राशीत पाच ग्रहांची युती होत असून मंगळ आणि राहु एकत्र आल्यामुळे 'अंगारक योग' तयार होत आहे.
advertisement
2/7
अंगारक योग मिथुनसह 4 राशींसाठी अत्यंत संघर्षाचा, मानसिक तणावाचा आणि रागाचा काळ ठरू शकतो. मंगळ 2 एप्रिलपर्यंत कुंभ राशीत राहणार आहे, तोपर्यंत या राशींनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
advertisement
3/7
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ नवव्या भावात गोचर करणार आहे. या काळात पैशांची देवाणघेवाण करताना खूप जपून राहा, कारण आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. स्वतःच्या आरोग्यासोबतच कुटुंबाच्या प्रकृतीचीही काळजी घ्या. करिअरमध्ये तुमचे शत्रू तुमच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न करू शकतात. कौटुंबिक जीवनात भावाशी मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता असून घराच्या कामासाठी धावपळ वाढू शकते.
advertisement
4/7
कर्क - मंगळ तुमच्या राशीतून आठव्या भावात प्रवेश करणार आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांशी बोलताना संयम ठेवा, कारण तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. यामुळे कामात तुमचे मन लागणार नाही. या काळात जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय पाऊल टाकू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.
advertisement
5/7
धनू - मंगळ तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात गोचर करेल. वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात तुमच्या कामाबद्दल कमालीचे सतर्क राहा. मित्रांना आपल्या मनातील गुप्त गोष्टी सांगणे टाळा, अन्यथा मानहानी होऊ शकते. आर्थिक ओढाताण जाणवेल, ज्यामुळे काही जण कर्ज घेण्याचा विचार करू शकतात. कुटुंबात वादाचे प्रसंग उद्भवल्याने मानसिक तणाव वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेणे गरजेचे आहे.
advertisement
6/7
कुंभ - मंगळ तुमच्या राशीच्या लग्न भावातच प्रवेश करत आहे. या काळात कामावर लक्ष केंद्रित करणे तुम्हाला कठीण जाईल, ज्यामुळे चिडचिड आणि मानसिक तणाव वाढू शकतो. शेअर बाजार किंवा सट्ट्यामध्ये गुंतवणूक करणे सध्या टाळलेलेच बरे.
advertisement
7/7
कुंभ - वैयक्तिक आयुष्यात जोडीदारासोबत अहंकार किंवा गैरसमजातून वाद होऊ शकतात. सासरच्या मंडळींकडूनही काही समस्या उभ्या राहू शकतात. नोकरी आणि व्यवसायात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Mangal Gochar 2026: प्रतिष्ठा धुळीस..! 4 राशींवर मोठं संकट; 48 तासात मंगळ-राहुची अभद्र युती जुळल्याबरोबर..