TRENDING:

Astrology: भाग्योदय जवळ आलाय! 14 जानेवारी रोजी सूर्याचा मकर राशीत प्रवेश; 6 राशींचे दिवस चमकणार

Last Updated:
Makar Sankranti 2026 Astrology : जानेवारी 2025 मध्ये दर महिन्याप्रमाणे सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत, जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत गोचर करणार आहेत. नवीन वर्ष 2025 च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये सूर्याचा मकर राशीत होणारा प्रवेश काही राशींसाठी आर्थिक, शारीरिक तसेच व्यावसायिक दृष्टीने विशेष लाभदायक ठरू शकतो. सूर्याचा मकर राशीत प्रवेश काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी फायदेशीर ठरणार आहे. पंचांगानुसार, सूर्य गोचर 2025 मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. जाणून घेऊया सूर्याच्या मकर राशीत प्रवेशामुळे कोणत्या राशींवर चांगला परिणाम होणार आहे. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी दिलेली माहिती जाणून घेऊ.
advertisement
1/6
भाग्योदय अगदी जवळ आलाय! 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत; 6 राशींचे दिवस चमकणार
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचा गोचर शुभ ठरणार आहे. या काळात आर्थिक प्रगती आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. जीवनात सकारात्मक बदल होण्याचे संकेत आहेत.
advertisement
2/6
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचा गोचर लाभदायक ठरेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीत पदोन्नतीची वाट पाहणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असेल. कुटुंबीय व प्रिय व्यक्तींंसोबत चांगला वेळ घालवता येईल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.
advertisement
3/6
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत चांगला ठरणार आहे. नवीन वर्षात आर्थिक प्रगती होऊ शकते. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. जीवनसाथीचा चांगला पाठिंबा मिळेल. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचा मकर राशीत प्रवेश चांगले दिवस घेऊन येईल. कामामध्ये आत्मविश्वासाने पुढे जाल. आर्थिक स्थिती भक्कम राहील. व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
वृश्चिक राशीच्या लोकांना नशीब साथ देईल. नशिबाच्या जोरावर एखाद्या मोठ्या कामात यश मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या बोलण्याने लोकांना प्रभावित करण्यात यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचा हा गोचर अत्यंत शुभ ठरू शकतो. तुम्हाला साडेसाती सुरू असताना सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत आहे. मीन राशीच्या लोकांना शासकीय यंत्रणेकडून लाभ मिळू शकतो. कार्यस्थळी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: भाग्योदय जवळ आलाय! 14 जानेवारी रोजी सूर्याचा मकर राशीत प्रवेश; 6 राशींचे दिवस चमकणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल