TRENDING:

Astrology 2026 : गुड न्यूज! 2026 वर्षाची सुरुवात गजकेसरी राजयोगात; या राशींच्या आयुष्याची नवी पहाट

Last Updated:
Astrology 2026: नवीन वर्ष 2026 सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. नव्या वर्षाकडून सर्वांनाच काही नव्या आशा-अपेक्षा असतात. ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या वर्ष 2026 ची सुरुवात अतिशय खास असणार आहे, वर्षाच्या सुरुवातीलाचा शुभ लाभ देणारा गजकेसरी राजयोग जुळून येत आहे. गुरू ग्रह आणि चंद्राची एखाद्या राशीत युती झाल्यानंतर हा शुभ योग तयार होत असतो.
advertisement
1/6
गुड न्यूज! 2026 ची सुरुवात गजकेसरी राजयोगात; या राशींच्या आयुष्याची नवी पहाट
गुरू ग्रह गेल्या 11 नोव्हेंबरपासून वक्री अवस्थेत आहे. वर्ष 2026 मध्ये गुरू ग्रह मिथुन राशीत राहणार आहे. 2026 मधील काही महिने गुरुची वक्री स्थिती असणार आहे. दरम्यान, चंद्र 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:25 वाजता मिथुन राशीत प्रवेश करेल. 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:42 पर्यंत तो याच ठिकाणी राहील. या काळात मिथुन राशीत गुरू आणि चंद्राची युती झाल्यानं गजकेसरी राजयोग निर्माण होईल. या योगाचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि ज्यांच्या कुंडलीवर याचा प्रभाव पडतो त्यांना आर्थिक प्रगती, व्यवसायात यश आणि प्रतिष्ठा मिळते. या योगामुळे बुद्धिमत्ता, ज्ञान आणि निर्णय घेण्याची क्षमता चांगली होते. या विशेष योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी तीन राशींना देवी लक्ष्मीकडून विशेष आशीर्वाद मिळतील. या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ, नवीन संधी आणि आर्थिक स्थिरता मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
2/6
वृषभ -वृषभ राशीच्या लोकांना नवीन वर्षात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. वर्षाच्या सुरुवातीला सुरू होणारा गजकेसरी राजयोग वृषभेच्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घेऊन येईल. आर्थिक, कौटुंबिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल. वृषभ राशीच्या लोकांचे एकंदरित आयुष्य सुखात असेल.
advertisement
3/6
वृषभ राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत गुड न्यूज मिळेल, काही दीर्घकाळापासून त्रास देणाऱ्या आजारांपासून सुटका होईल. लग्नासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आता निराशा येणार नाही, कुटुंबात अनेक शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामावर नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात, त्यानं तुमची कीर्ती आणि संपत्ती दोन्ही वाढेल.
advertisement
4/6
मिथुन - मिथुन राशीतच गुरू आणि चंद्राची युती होत असून त्यामुळेच गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांना सर्वात जास्त लाभ मिळणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात मिथुन राशीच्या लोकांना प्रगती, यश आणि आदर देईल.
advertisement
5/6
मिथुनेच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती आणि आर्थिक लाभाच्या संधी मिळतील, तर व्यवसायात असलेल्यांना चांगला नफा आणि नवीन विस्तार दिसेल. तुमच्या बोलण्याचा लोकांवर चांगला परिणाम होईल, ज्यामुळे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करणे सोपे होईल. सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. अविवाहित असलेल्यांसाठी लग्न होण्याचा योग आता येईल. एकंदरीत, हा काळ मिथुन राशीसाठी प्रगती, समृद्धी आणि प्रतिष्ठेचाअसेल.
advertisement
6/6
तूळ - या योगात तूळ राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात तूळ राशीच्या लोकांसाठी झकास असेल. गजकेसरी राजयोग तूळ राशीच्या लोकांना लकी ठरेल. करिअर, आर्थिक आणि नातेसंबंधांच्या क्षेत्रात सकारात्मक बदल होतील. करिअरच्या नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले जाईल. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता असेल. आर्थिक स्थिती भक्कम होईल, संपत्तीत सतत वाढ होण्याची शक्यता आहे. घरात सुख-समाधानाचे वातावरण राहील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology 2026 : गुड न्यूज! 2026 वर्षाची सुरुवात गजकेसरी राजयोगात; या राशींच्या आयुष्याची नवी पहाट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल