Numerology: तुमचा जन्म 2, 11, 20, 29 या तारखांना झालाय? नावाचं पहिलं अक्षर यापैकीच असणं शुभ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Number 2 Name: अंकशास्त्रानुसार, आपल्या आयुष्यात जन्म तारीख महत्त्वाची असते, तसंच आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरालाही खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण जन्म तारखेवरून मूलांक आणि भाग्यांक काढतो, तेव्हा आपल्या मूलांकाशी आपलं नाव जुळतं की नाही, हे पाहिलं पाहिजे. तुमच्या नावाचं पहिलं अक्षर तुमच्या मूलांकाला अनुकूल नसेल, किंवा संपूर्ण नावाची बेरीज मूलांकाशी जुळत नसेल, तर प्रगतीत अडचणी येऊ शकतात. दोन विरुद्ध संख्या किंवा शत्रू संख्यांच्या प्रभावामुळे आयुष्यात संघर्ष आणि त्रास वाढू शकतो. आज आपण मूलांक 2 च्या लोकांसाठी नावाच्या सुरुवातीच्या शुभ अक्षरांविषयी जाणून घेऊ.
advertisement
1/5

तुमच्या बाळाचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल, तर त्याच्या नावाचं पहिलं अक्षर मूलांक 2 शी जुळणारं ठेवणं महत्त्वाचं आहे.मूलांक 2: स्वामी चंद्र आणि गणनाज्यांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 आहे, त्यांचा मूलांक 2 असतो. उदा.11 चा मूलांक 1+1=2.29 चा मूलांक 2+9=11, आणि 1+1=2.अंक ज्योतिषामध्ये मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. चंद्राला आपल्या मनाचा कारक मानलं जातं. त्यामुळे, मूलांक 2 असलेल्या मुलांच्या नावाचं पहिलं अक्षर चंद्राच्या मित्र ग्रहांशी संबंधित अंकांवरून असायला हवं. शत्रू ग्रहांशी संबंधित अक्षरांमुळे अडचणी येऊ शकतात.
advertisement
2/5
मूलांक 2 चे शत्रू आणि रिलेशनमधील अडचणी -मूलांक 2 चे शत्रू किंवा विरोधी मूलांक 4, 8 आणि 9 मानले गेले आहेत.4 चा स्वामी राहु.8 चा स्वामी शनी.9 चा स्वामी मंगळ.मूलांक 2 चे लोक मनाने कोमल आणि भावनांच्या आहारी जाणारे असतात. त्यांचे मन नेहमी बदलत असते आणि ते मनापासून काम करतात.राहुची बुद्धी खूप तल्लख असते, जी चंद्राच्या भावनांसाठी योग्य नाही.शनी व्यवहार्य (Practical) बोलतो, जो चंद्राच्या भावना समजू शकत नाही.मंगळात खूप ऊर्जा आणि आवेग असतो, तो फक्त कामापुरतं बोलतो, त्यामुळे चंद्राला त्रास होतो. भावना त्याला समजत नाहीत.
advertisement
3/5
मूलांक 2 साठी अशुभ ठरणारी अक्षरे -अंकशास्त्रामध्ये प्रत्येक अक्षराचे एक मूल्य ठरलेले आहे. या मूल्यांवर आधारित, D, M, T, F आणि P या अक्षरांनी सुरू होणारी नावं मूलांक 2 च्या लोकांसाठी ठेवू नयेत.D, M, T चे मूल्य 4 आहे.F आणि P चे मूल्य 8 आहे.I आणि R चे मूल्य 9 मानले जाते.ही सर्व अक्षरे मूलांक 2 च्या विरुद्ध स्वभाव आणि गुणांची असतात.
advertisement
4/5
मूलांक 2 साठी शुभ अक्षरे -मूलांक 2 चे मित्र मूलांक 1, 3, 5, 6 आणि 7 आहेत. यावर आधारित नावं निवडायला हवीत.1 चा स्वामी सूर्य.3 चा स्वामी गुरू.5 चा स्वामी बुध.6 चा स्वामी शुक्र.7 चा स्वामी केतू.या आधारावर, मूलांक 2 साठी नावाची सुरुवात A, I, J, Q, Y, B, K, R, C, G, L, S, E, H, N, X, U, V, W, O आणि Z या शुभ अक्षरांनी झाली तर चांगले परिणाम मिळतात.
advertisement
5/5
नावाच्या पहिल्या अक्षराशिवाय काय?नावाचं पहिलं अक्षर, मूलांक आणि भाग्यांक जुळणं चांगली गोष्ट आहे, पण तेच सगळं काही नाही. जर तुमचं नाव शुभ अक्षराने सुरू होत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही अंकशास्त्र तज्ज्ञाकडून आपलं नाव सुधारून घेऊ शकता. ते तुमच्या मूलांक आणि भाग्यांकाशी जुळवून घेण्यासाठी नावामध्ये छोटे बदल करण्याचा सल्ला देतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: तुमचा जन्म 2, 11, 20, 29 या तारखांना झालाय? नावाचं पहिलं अक्षर यापैकीच असणं शुभ