TRENDING:

Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; झाली प्रतिक्षा संपली, आता खुशखबर

Last Updated:
Weekly Horoscope: नवीन आठवडा सुरू होताना प्रत्येकाला नव्या आठवड्यात काहीतरी चांगली होण्याची अपेक्षा असते. ज्योतिषशास्त्रात ग्रह-नक्षत्रांची स्थिती पाहून राशींचे अंदाज वर्तवले जातात. ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी सांगितलेले सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/7
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; झाली प्रतिक्षा संपली, आता खुशखबर
सिंह साप्ताहिक राशीभविष्य - सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा खर्चिक ठरू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्यावर आर्थिक बोजा वाढू शकतो, त्यामुळे खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे. आर्थिक बाबींसोबतच आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे, किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष केल्यास दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा कारण दुखापतीची भीती आहे.
advertisement
2/7
सिंह - व्यवसायात प्रगतीची गती थोडी मंद असेल आणि नफा अपेक्षेपेक्षा कमी मिळू शकतो. तरीही निराश होऊ नका, कारण परिस्थिती लवकरच सुधारेल. आठवड्याच्या उत्तरार्धात कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो, जो नवीन ओळखी करून देणारा ठरेल. कौटुंबिक शांततेसाठी छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे उत्तम ठरेल. जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि अहंकाराला नात्यात स्थान देऊ नका.लकी कलर: यलोलकी नंबर: 5
advertisement
3/7
कन्या साप्ताहिक राशीभविष्य - कन्या राशीच्या ज्या व्यक्ती परदेशात करिअर करू इच्छितात किंवा परदेशी व्यापारात आहेत, त्यांच्यासाठी हा आठवडा चांगली बातमी घेऊन येईल. व्यापारासाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक फायदेशीर आणि प्रगतीकारक असेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला मोठा फायदा मिळू शकतो. नोकरीत असलेल्यांना त्यांचे उद्दिष्ट वेळेआधी पूर्ण करण्यात यश मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. पदोन्नती किंवा पगारवाढीच्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी तुम्ही नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता. घरात सुख-शांतीचे वातावरण राहील आणि भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल.लकी कलर: पर्पललकी नंबर: 3
advertisement
4/7
तूळ साप्ताहिक राशीभविष्य - तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मोठ्या यशाचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची भेट एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी होईल, ज्यांच्या मदतीने भविष्यात फायदेशीर प्रकल्प मिळतील. सरकारी कामात आणि राजकारणात असलेल्यांना अपेक्षित यश मिळेल. सरकारी योजनांमध्ये अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. तुम्ही कंत्राटी तत्त्वावर काम करत असाल, तर मोठे टेंडर मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
तूळ - नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. या आठवड्यात तुम्ही चैनीच्या वस्तूंवर मोठा खर्च करू शकता. कुटुंबासोबत सहलीचे किंवा पार्टीचे नियोजन होऊ शकते. मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळाल्यामुळे समाजात तुमची मान वाढेल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल.लकी कलर: मरूनलकी नंबर: 1
advertisement
6/7
वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य - वृश्चिक राशीच्या लोकांनी या आठवड्यात गुप्त शत्रूंपासून अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे. तुमचे विरोधक कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा डागाळण्याचा किंवा कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. या आठवड्यात नशिबावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. कामाचे नियोजन सुरुवातीलाच करा, तरच तुम्ही वेळेत तुमचे टार्गेट पूर्ण करू शकाल. आर्थिक व्यवहारात व्यापाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, कोणालाही उधारीवर पैसे देऊ नका कारण ते अडकण्याची भीती आहे.
advertisement
7/7
वृश्चिक - कुटुंबात मालमत्तेवरून किंवा इतर कारणावरून वाद होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला थोडे नैराश्य जाणवू शकते. उत्तरार्धात धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीमुळे मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारा.लकी कलर: मॅजेंटालकी नंबर: 5
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीफळ; झाली प्रतिक्षा संपली, आता खुशखबर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल