TRENDING:

उद्या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी, बाप्पा करेल सर्व इच्छा पूर्ण, चंद्रोदय किती वाजता?

Last Updated:
मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला 'गणाधिप संकष्टी' म्हणून साजरी केली जाते. यावर्षी मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी केव्हा आहे, 7 डिसेंबरला की 8 डिसेंबरला, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे.
advertisement
1/7
उद्या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय किती वाजता?
मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला 'गणाधिप संकष्टी' म्हणून साजरी केली जाते. यावर्षी मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी केव्हा आहे, 7 डिसेंबरला की 8 डिसेंबरला, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे.
advertisement
2/7
संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणपतीचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे दुःख आणि कष्ट नाहीसे होतात अशी लोकांची श्रद्धा आहे.
advertisement
3/7
मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या गणाधिप रूपाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते. पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 7 डिसेंबर 2025 रोजी वाजता सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी, 8 डिसेंबर 2025 रोजी संपेल.
advertisement
4/7
मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी तिथी 7 डिसेंबर, रविवारी सकाळी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 8 डिसेंबर, सोमवारी संपेल. त्यामुळे गणाधिप संकष्टी चतुर्थी 7 डिसेंबर रोजीच साजरी केली जाईल.
advertisement
5/7
या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 8:19 ते दुपारी 1:31 पर्यंत आहे. पूजेचा शुभ काळ संध्याकाळी 5:24 ते रात्री 10:31 पर्यंत आहे. चांद्र महिन्याच्या कृष्णपक्षात चंद्रोदयाच्यावेळी चतुर्थी असेल तर त्या दिवसाला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.
advertisement
6/7
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवशी जर मंगळवार असेल तर ती संकष्टी चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी समजली जाते. संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन सोडला जातो. तर काही लोक संकष्टी चतुर्थीला संपूर्ण दिवस उपवास करतात.
advertisement
7/7
मार्गशीष संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची नेमकी वेळ काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, डिसेंबरमधील 2025 मधील शेवटची संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय 7:59 वाजता होईल. तर काही ठिकाणी चंद्रोदयाची वेळ 8 वाजल्यानंतर असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
उद्या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी, बाप्पा करेल सर्व इच्छा पूर्ण, चंद्रोदय किती वाजता?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल