TRENDING:

बुध गोचर 'या' 5 राशींसाठी ठरणार वरदान, जॉब-बिझनेसमध्ये होणार जबरदस्त फायदा; येणार सुखाचे दिवस!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह बुद्धी, संवाद आणि व्यापाराचा कारक आहे. 11 एप्रिल 2026 रोजी बुध देव मीन राशीत प्रवेश करणार आहेत.
advertisement
1/6
बुध गोचर 'या' 5 राशींसाठी ठरणार वरदान, जॉब-बिझनेसमध्ये होणार जबरदस्त फायदा
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह बुद्धी, संवाद आणि व्यापाराचा कारक आहे. 11 एप्रिल 2026 रोजी बुध देव मीन राशीत प्रवेश करणार आहेत. मीन ही बृहस्पतीची रास असून बुध येथे काहीसा कमकुवत मानला जात असला तरी, या गोचरामुळे निर्माण होणारी विशिष्ट ग्रहस्थिती 5 राशींसाठी नशिबाची दारे उघडणारी ठरेल.
advertisement
2/6
वृषभ - उत्पन्नात मोठी वाढ: वृषभ राशीच्या अराव्या भावात बुधाचे आगमन होणार आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जे जातक व्यापारी आहेत, त्यांना या काळात मोठा नफा मिळेल. जुनी येणी वसूल होतील आणि गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.
advertisement
3/6
मिथुन - करिअरमध्ये सुवर्णसंधी: मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुध आहे. दहाव्या भावात होणारे हे गोचर नोकरी करणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील किंवा सध्याच्या नोकरीत पदोन्नतीचे योग येतील. तुमच्या कामातील कल्पकता आणि चिकाटीचे वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
advertisement
4/6
कन्या - भागीदारीत यश आणि प्रगती: तुमच्या सातव्या भावात बुधाचे भ्रमण होणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना या काळात मोठे यश मिळेल. जोडीदाराच्या मदतीने तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता. समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढेल आणि तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्ही कठीण कामे सहज पूर्ण कराल.
advertisement
5/6
वृश्चिक - अचानक धनलाभ: वृश्चिक राशीच्या पाचव्या भावात बुध जाणार आहे. यामुळे शिक्षण आणि प्रेमाच्या क्षेत्रात यश मिळेल. शेअर मार्केट किंवा सट्टेबाजीशी संबंधित असलेल्यांना अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे घरातील वातावरण आनंदी राहील आणि एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल.
advertisement
6/6
कुंभ - वाणीचा प्रभाव आणि धनवृद्धी: कुंभ राशीच्या दुसऱ्या भावात बुधाचे गोचर होणार आहे. तुमची वाणी प्रभावी ठरेल, ज्यामुळे तुम्ही लोकांचे मन जिंकाल. अडकलेले पैसे परत मिळतील आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ 'बंपर' नफा देणारा ठरेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
बुध गोचर 'या' 5 राशींसाठी ठरणार वरदान, जॉब-बिझनेसमध्ये होणार जबरदस्त फायदा; येणार सुखाचे दिवस!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल