TRENDING:

Parakram Yog: सूर्य-मंगळ एकाच नक्षत्रात येत असल्यानं पराक्रम योग! या राशींना अनपेक्षित लाभ

Last Updated:
Parakram Yog in Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार 3 डिसेंबर रोजी दुपारी 1:13 वाजता सूर्य ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. यासोबतच मंगळही 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता या नक्षत्रात प्रवेश करेल. अशा स्थितीत ज्येष्ठा नक्षत्रात दोन्ही ग्रहांचा संयोग असल्यामुळे 'पराक्रम' नावाचा योग तयार होत आहे. गृहांच्या या स्थितीत सूर्य आणि मंगळ काही राशीच्या लोकांच्या जीवनावर विशेष प्रभाव टाकतील. या दोन्ही ग्रहांचा संयोग नक्षत्रात एकत्र होत आहे. दोन्ही ग्रह वृश्चिक राशीतही असतील. ज्योतिषांच्या मते, हा योग काही राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकतो. या योगाच्या निर्मितीने धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वासाची कमतरता दूर होते आणि मानसिक आणि शारीरिक समस्यांपासूनही आराम मिळतो. जाणून घेऊया पराक्रम योगाच्या निर्मितीमुळे कोणत्या राशींना विशेष फायदे होतील.
advertisement
1/6
सूर्य-मंगळ एकाच नक्षत्रात येत असल्यानं पराक्रम योग! या राशींना अनपेक्षित लाभ
मेष - मेष राशीच्या लोकांसाठी पराक्रम राजयोग शुभ ठरू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. आत्मविश्वास आणि हुशारीने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायातही भरपूर यश आणि नफा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
2/6
मेष - परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश मिळू शकते. फ्रेशर्सना नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. जमीन आणि मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. मुलांकडूनही तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील आणि तुम्हाला कर्जातूनही दिलासा मिळेल.
advertisement
3/6
सिंह - या राशीच्या लोकांसाठीही पराक्रम योग शुभ ठरेल. ज्येष्ठा नक्षत्रात पराक्रम योग तयार झाल्यानं या राशीला प्रत्येक क्षेत्रात धैर्य आणि आत्मविश्वासाने यश मिळू शकते. जुनी देणी परत मिळू शकतात. समाजात सन्मान वाढेल.
advertisement
4/6
सिंह - कौटुंबिक कलहातून तुम्हाला आराम मिळेल. भौतिक सुखसोयी मिळू शकतात. तुम्ही तुमच्या करिअरमध्येही उड्डाण घेऊ शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. यामुळे तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळू शकते.
advertisement
5/6
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठीही पराक्रम योग फायदेशीर ठरू शकतो. इच्छित यश मिळू शकते. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना थोडी मेहनत करावी लागेल. यश नक्कीच मिळेल. इच्छित नफा मिळवता येईल.
advertisement
6/6
तूळ - राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप शुभ आहे. अशक्य कामातही यश मिळू शकते. यासोबतच कुटुंबातील एखाद्याची काही चांगली बातमी मिळू शकते. या महिन्यात तुमची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Parakram Yog: सूर्य-मंगळ एकाच नक्षत्रात येत असल्यानं पराक्रम योग! या राशींना अनपेक्षित लाभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल