TRENDING:

5 डिसेंबरच्या पहाटे दत्त जयंती संपताच या 3 राशींच्या आयुष्याची लागणार लॉटरी! पैसा, सुख, प्रेम मिळणार

Last Updated:
Datta Jayanti 2025 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या हालचालींचा मनुष्याच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो, असे मानले जाते.
advertisement
1/5
दत्त जयंती संपताच या राशींच्या आयुष्याची लागणार लॉटरी! पैसा, सुख, प्रेम मिळणार
ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती आणि त्यांच्या हालचालींचा मनुष्याच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो, असे मानले जाते. विशेषतः गुरू ग्रह हा ज्ञान, समृद्धी, भाग्य आणि वाढ यांचे प्रतीक आहे. त्यामुळे या ग्रहाच्या हालचालीत झालेला बदल अनेक राशींच्या भाग्यावर थेट परिणाम घडवून आणतो. डिसेंबर 2025 हा महिना अशाच एका महत्त्वपूर्ण ग्रहबदलाचा साक्षीदार ठरणार आहे.
advertisement
2/5
ज्योतिषांच्या मते, 5 डिसेंबर 2025 रोजी गुरू ग्रह मिथुन राशीत वक्री होणार आहे. या बदलामुळे काही राशींच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि जीवनातील महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये मोठी उन्नती होण्याची दाट शक्यता आहे. गुरूचा हा वक्री प्रवास काहींसाठी आव्हानात्मक असू शकतो, मात्र तीन राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल ठरेल.
advertisement
3/5
वृषभ - गुरूची स्थिती वृषभ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरणार आहे. वडिलोपार्जित व्यवसाय किंवा मालमत्तेमध्ये अपेक्षित लाभ मिळू शकतो. ज्येष्ठांकडून किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता आहे. बचत वाढेल आणि गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. करिअरमधील अनेक अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. भावंडांचे सहकार्य मिळाल्याने अनेक कामे वेगाने पूर्ण होतील. आरोग्य सुधारेल आणि मानसिक स्थैर्य मिळेल. एकूणच, गुरूचा वक्री प्रवास वृषभ राशीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल.
advertisement
4/5
सिंह - या राशींसाठी गुरूचा बदल म्हणजे संधीचे नवे दालन उघडण्यासारखे आहे. रखडलेल्या योजना गती घेतील. जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. व्यवसाय विस्तारासाठी हा काळ उत्तम राहील. नोकरी शोधणाऱ्यांना चांगले पर्याय उपलब्ध होतील. सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या व्यक्तींना पदोन्नतीची संधी मिळू शकते. सामाजिक मान–प्रतिष्ठा वाढेल, वक्तृत्वाची ताकद वाढेल. सिंह राशीसाठी हा काळ करिअरमध्ये आणि सामाजिक जीवनात मोठी प्रगती घडवेल.
advertisement
5/5
कन्या -  कन्या राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचा वक्री कालखंड उर्जादायी आणि प्रोत्साहन देणारा असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. कामाच्या ठिकाणी नवे प्रोजेक्ट्स, जबाबदाऱ्या मिळू शकतात. परदेशात काम किंवा शिक्षणाची इच्छा असलेल्यांना ही संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
5 डिसेंबरच्या पहाटे दत्त जयंती संपताच या 3 राशींच्या आयुष्याची लागणार लॉटरी! पैसा, सुख, प्रेम मिळणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल