TRENDING:

101, 105, 108, 123, Ruturaj Gaikwad ची सेंचुरी ठरते डोकेदुखी, तब्बल 4 वेळा झालय टीमला नुकसान

Last Updated:
भारत vs साउथ आफ्रिका यांच्यातील सामन्यात भारताच्या दोन खेळाडूंनी सेंचुरी केली आणि भारताने 359 धावांचा लक्ष साऊथ आफ्रिकेसमोर ठेवलं. पण एवढी मोठी धावसंख्या समोर असूनही साउथ आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली आणि हा सामना जिंकला.
advertisement
1/7
ऋतुराजची सेंचुरी ठरते डोकेदुखी, तब्बल 4 वेळा झालय टीमला नुकसान
भारत आणि साउथ आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
2/7
अशा परिस्थितीत कालच्या सामन्यात भारताच्या दोन खेळाडूंनी सेंचुरी केली आणि भारताने 359 धावांचा लक्ष साऊथ आफ्रिकेसमोर ठेवलं. पण एवढी मोठी धावसंख्या समोर असूनही साउथ आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली आणि हा सामना 4 विकेट्सने जिंकला.
advertisement
3/7
पण या सगळ्यानंतर आता एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी कोणत्याही फलंदाजासाठी मोठ्या खेळी खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः भारतासाठी खेळताना शतक करणे हे प्रत्येक फलंदाजाचे स्वप्न असते. विजय मिळवून देणारे शतक हे खूप आनंददायी असते. पण हेच शतक जर संघासाठी दुर्दैवी ठरत असेल तर?
advertisement
4/7
हो, काल खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकल. पण जेव्हा जेव्हा ऋतुराजने शतकी खेळी खेळली आहे तेव्हा तेव्हा पराभव झाला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय सामन्यातही असेच काही घडले, जिथे गायकवाडने शानदार खेळी केली पण टीम इंडियाचा पराभव झाला आणि हे पहिल्यांदाच घडले आहे असे नाही.
advertisement
5/7
यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत ज्यामुळे ऋतुराज जेव्हा जेव्हा शतक करतो तेव्हा पराभव निश्चित असल्याचे मानले जाते. यापूर्वी जेव्हा त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी 10 वेळा शतकी खेळी खेळली त्यापैकी 2 सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
advertisement
6/7
प्रथम, आयपीएल 2021 मध्ये, ऋतुराजने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 101 धावा केल्या, परंतु राजस्थानने 190 धावांचे लक्ष्य गाठले. त्यानंतर, आयपीएल 2024 मध्ये, गायकवाडने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 108 धावा केल्या आणि तरीही लखनऊने 211 धावांचे लक्ष्य गाठले.
advertisement
7/7
28 नोव्हेंबर 2023 रोजी, गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात, गायकवाडने 123 धावा केल्या, जे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक होते. तथापि, ग्लेन मॅक्सवेलच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने 223 धावांचे लक्ष्य गाठले. टी-20 मध्ये भारताविरुद्धचा हा सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
101, 105, 108, 123, Ruturaj Gaikwad ची सेंचुरी ठरते डोकेदुखी, तब्बल 4 वेळा झालय टीमला नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल