TRENDING:

Sarvapitru Amavasya 2025: पितृ प्रसन्न होऊन कुटुंबाला देतील आशीर्वाद! राशीनुसार असा करावा दान-धर्म, लास्ट चान्स

Last Updated:
Sarvapitru Amavasya 2025: पितृपक्ष सर्वपित्री अमावस्येला संपतो, यावर्षी सर्वपित्री अमावस्या रविवार, 21 सप्टेंबर 2025 रोजी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण देखील याच दिवशी लागत आहे, ज्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढलंय. सर्वपित्री अमावस्येला आपल्या कुटुंबातील मृत झालेल्यांसाठी श्राद्ध-विधी केले जातात. मृत्यु तिथी माहीत नसते किंवा अमावस्या, पौर्णिमा किंवा चतुर्दशी तिथीला मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे श्राद्ध देखील या दिवशी केले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार अमावस्येला केलेले श्राद्ध संपूर्ण कुळातील पूर्वजांच्या आत्म्याला तृप्त करते. यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद सतत मिळत राहतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार, अमावस्येला श्राद्धाव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या राशीनुसार काही वस्तू दान करून तुमच्या पूर्वजांनाही प्रसन्न करू शकता. सर्वपित्री अमावस्येला तुमच्या राशीनुसार या गोष्टी दान करा.
advertisement
1/6
पितृ प्रसन्न होऊन देतील आशीर्वाद! राशीनुसार असा करा दान-धर्म, लास्ट चान्स
मेष - गहू, शेंगदाणे आणि मध दान करा.वृषभ - पैसे, धान्य, मोती, दूध, दही आणि तूप दान करा.
advertisement
2/6
मिथुन - हिरव्या भाज्या, मूग आणि हिरवे कपडे दान करणे शुभ आहे.कर्क - मीठ, तूप, साखर, दही, दूध, धोतर किंवा साडी दान करा.
advertisement
3/6
सिंह - गूळ, हरभरा आणि मध दान केल्याने शुभ फळे मिळतात.कन्या - तुपापासून बनवलेल्या मिठाई आणि फळांचे दान करा. 
advertisement
4/6
तूळ - तांदूळ आणि नारळ दान करणे शुभ आहे.वृश्चिक - तीळ, गूळ, मध आणि सफरचंद दान करा.
advertisement
5/6
धनु - पिवळी फळे, पिवळी वस्त्रे आणि केळी दान करा.मकर - काळे मूग, काळे तीळ, ब्लँकेट, चादरी आणि बूट दान करणे शुभ आहे.
advertisement
6/6
कुंभ - पैसे, बूट, धान्य आणि मच्छरदाणी दान करा.मीन - केळी, मिठाई आणि डाळी दान केल्याने पूर्वजांना आनंद होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Sarvapitru Amavasya 2025: पितृ प्रसन्न होऊन कुटुंबाला देतील आशीर्वाद! राशीनुसार असा करावा दान-धर्म, लास्ट चान्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल