Vakri Budh: बुधाची वक्री चाल गोत्यात आणणार! भलत्याच गोष्टींमध्ये अडकतील या राशीची माणसं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Mercury Retrograde in Aries 2024: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानलं जातं. बुध हा बुद्धिमत्ता, ज्ञान, विचार करण्याची क्षमता, उत्तम तर्क क्षमता आणि चांगले संवाद कौशल्य यांचा कारक मानला जातो. विशेषत: बुद्धीमत्तेचा कारक मानला जाणारा बुध ग्रह, मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे. तो कन्या राशीत उच्च आणि मीन राशीमध्ये खालच्या स्थितीत असतो. बुध ग्रहाच्या कृपेनं एखाद्या व्यक्तीमध्ये अनेक उत्कृष्ट कौशल्ये निर्माण होतात. त्यामुळे व्यक्तीला जीवनाच्या अनेक क्षेत्रात यश मिळविण्यात मदत होते. 2024 मध्ये बुध वक्री चाल करणार आहे.
advertisement
1/4

जेव्हा बुध वक्री असतो तेव्हा व्यक्तीची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे नातेसंबंध आणि करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. 2024 मध्ये बुध ग्रहाच्या वक्री स्थितीत कोणत्या राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/4
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांसाठी 2024 मध्ये बुधाची वक्री स्थिती खराब परिणाम देईल. करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. बुध ग्रहाच्या प्रभावामुळं तुमचं बोलणं कठोर होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळे या राशीच्या लोकांनी 2024 मध्ये खूप विचारपूर्वक बोलावं, असा सल्ला देण्यात येत आहे. बुध वक्री असल्यानं नात्यात चढ-उतार येऊ शकतात. या काळात तुमचे आरोग्यही बिघडू शकते. 2024 मध्ये तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल.
advertisement
3/4
सिंह - वक्री होणाऱ्या बुधामुळे सिंह राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बुध ग्रहाच्या वक्री स्थितीच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार येऊ शकतात. जोडीदारासोबत तुमचे गैरसमज वाढू शकतात. वक्री बुध नवविवाहित जोडप्यांना देखील समस्या निर्माण करू शकतो. कठोर शब्दांमुळे तुमचे संबंध आणखी बिघडू शकतात. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. या राशीच्या लोकांना व्यवसायातही नुकसान होऊ शकते.
advertisement
4/4
मकर - नवीन वर्षात बुधाची वक्री स्थिती तुमच्या मान-सन्मानासाठी चांगली नाही. काही कारणांमुळे तुमची प्रतिष्ठा दुखावली जाऊ शकते. तुमची अनेक कामे पूर्ण होत असताना अडकू शकतात. ऑफिसमध्येही तुमच्या कामात अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. बुधाची वक्री स्थिती असताना या राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होणार नाही, असे संकेत आहेत. वक्री बुधामुळे तुम्ही करिअरशी संबंधित कोणताही निर्णय अत्यंत सावधगिरीने घ्या. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे मतभेदही वाढू शकतात. परदेशात जाण्याच्या योजनाही अडचणीत येऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Vakri Budh: बुधाची वक्री चाल गोत्यात आणणार! भलत्याच गोष्टींमध्ये अडकतील या राशीची माणसं