'मी नवऱ्यापेक्षा जास्त कमावते', सोनाली कुलकर्णीचा रोखठोक अंदाज; लग्नानंतरच्या आर्थिक निर्णयांवर स्पष्टच बोलली
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sonalee Kulkarni husband income: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनालीने तिच्या संसारातील अशा काही गोष्टी उघड केल्या आहेत, ज्या ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
1/10

मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' अर्थात सोनाली कुलकर्णी ही केवळ तिच्या नृत्यासाठी किंवा अभिनयासाठीच नाही, तर तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते.
advertisement
2/10
व्यावसायिक आयुष्यात यशाची नवनवीन शिखरं सर करणारी सोनाली वैयक्तिक आयुष्यातही तितकीच खंबीर आहे.
advertisement
3/10
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या संसारातील अशा काही गोष्टी उघड केल्या आहेत, ज्या ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
4/10
विशेषतः लग्नानंतरच्या आर्थिक स्वातंत्र्यावर तिने केलेलं भाष्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.
advertisement
5/10
सोनालीने कुणाल बेडेकरशी लग्न करून आपला संसार थाटला. पण कुणालचीच निवड का केली? यावर बोलताना ती म्हणाली, "मला असा जोडीदार हवा होता, जो मला फिल्म इंडस्ट्रीच्या पलीकडचं जग दाखवेल. घरी आल्यावर पुन्हा त्याच कामाच्या गप्पा मला नको होत्या."
advertisement
6/10
सोनाली पुढे म्हणाली, "कुणालने मला जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. आम्ही दोघेही फिरण्याचे शौकीन आहोत आणि दर वाढदिवसाला एक नवीन देश पालथा घालायचा, असा आमचा नियमच आहे."
advertisement
7/10
कुणाल लंडनमध्ये राहत असल्यामुळे अनेकांनी सोनालीला टोमणे मारले होते. यावर सोनालीने सडेतोड उत्तर दिलं.
advertisement
8/10
ती म्हणाली, "लोकांना वाटतं नवरा लंडनचा आहे म्हणजे तो खूप श्रीमंत असेल आणि मी त्याच्या पैशासाठी लग्न केलं असेल. पण मला अभिमानाने सांगायला आवडेल की, मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते. आमची यावर स्पष्ट चर्चा झाली आहे आणि कुणालला त्याचं कधीच वावगं वाटलं नाही किंवा त्याला असुरक्षित वाटत नाही."
advertisement
9/10
सोनाली आणि कुणालचा संसार जरी एकत्र असला, तरी त्यांचे आर्थिक व्यवहार मात्र पूर्णपणे स्वतंत्र आहेत.
advertisement
10/10
सोनालीने सांगितलं की, "माझे आणि कुणालचे बँक अकाउंट्स वेगळे आहेत. विशेष म्हणजे, माझ्या कामाचे पैसे कुठे गुंतवायचे किंवा किती खर्च करायचे, हे आजही माझे बाबाच ठरवतात. माझ्या आर्थिक व्यवहारांत कुणाल किंवा माझ्या सासरच्या मंडळींचा कोणताही हस्तक्षेप नसतो. मी किती कमावते आणि ते पैसे कुठे जातात, हे कुणालने मला कधीच विचारलं नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी नवऱ्यापेक्षा जास्त कमावते', सोनाली कुलकर्णीचा रोखठोक अंदाज; लग्नानंतरच्या आर्थिक निर्णयांवर स्पष्टच बोलली