TRENDING:

ShaniDev: साडेसाती चालू आहे, अडचणींचा वेढा इतक्यात संपणार नाही; या राशीच्या लोकांची होणार दैना

Last Updated:
Shani Gochar 2025: ग्रहांचे संक्रमण ही ज्योतिषशास्त्रात एक महत्त्वाची घटना मानली जाते. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा विशेष प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. मार्च 2025 मध्ये ज्योतिषशास्त्रातील महत्त्वाची अन् दुर्मीळ घटना घडली, शनिच्या राशीत बदल झाला असून शनिने मीन राशीत प्रवेश केलाय. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. तो एका राशीत अडीच वर्षे राहतो. अशाप्रकारे, पुन्हा त्याच राशीत परत येण्यासाठी अंदाजे 30 वर्षे लागतात.
advertisement
1/7
साडेसाती चालू आहे, अडचणींचा वेढा इतक्यात संपणार नाही; या राशीच्या लोकांची दैना
आता शनी मार्चमध्ये कुंभेतून गुरूच्या मीन राशीत आला आहे. शनीच्या राशीतील बदलामुळे काही राशीच्या लोकांवर वाईट दिवस सुरू झाले आहेत. आज आपण मीन राशीच्या लोकांवर सध्या होत असलेल्या परिणामांविषयी जाणून घेऊ.
advertisement
2/7
शनीच्या या संक्रमणाचा मीन राशीच्या लोकांवर विशेष प्रभाव पडेल कारण तो तुमच्या राशीतच आला आहे. शनी तुमच्या राशीच्या अकराव्या आणि बाराव्या स्थानी आहे, जो तुमच्या तिसऱ्या, सातव्या आणि दहाव्या स्थानावर लक्ष ठेवेल. शनीचे भ्रमण लग्न भावात होणार आहे. यातून व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि कीर्ती विचारात घेतली जाते. मीन राशीवर साडेसातीचा मधला टप्पा सुरू होईल.
advertisement
3/7
शनीदेवाचे हे संक्रमण तुम्हाला विशेष परिश्रमानेच काही फायदा देऊ शकते. या संक्रमणामुळे तुम्हाला गुंतवणूक इत्यादींमधून फक्त नुकसानच सहन करावे लागेल. कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम करू नका, अन्यथा पश्चाताप करावा लागेल, सध्याचा काळ वाईट आहे.
advertisement
4/7
साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असल्यानं तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात अधिक काळजी घ्यावी लागेल. तुमच्या वैवाहिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराला आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रास होऊ शकतो. त्यांच्याशी तुमचे नाते बिघडू शकते.
advertisement
5/7
व्यवसायात नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित होतील, पण कोणाशीही व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. जे लोक नोकरी करतात त्यांना हुशारीने काम करावे लागेल. लपलेले शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवतील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करू नका.
advertisement
6/7
साडेसातीचा दुसरा टप्पा मीन राशीवर असल्यानं 2025 सालात मानसिक ताण आणि शारीरिक समस्या वाढू शकतात. या काळात तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. या महागोचरामुळे, मीन राशीच्या लोकांना मानसिक ताण, कंबरदुखी, पायदुखी, नसादुखी आणि रक्ताशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
advertisement
7/7
उपाय - शनिवारी छाया दान करा. तसेच नियमितपणे शनिदेवाची पूजा करा आणि शनि चालीसा पठण करा. गरजू लोकांना मदत करा. हे संक्रमण तुमच्या आयुष्यात अनेक नवीन अनुभव घेऊन येईल, म्हणून सर्व परिस्थितींना संयम आणि समजूतदारपणे तोंड द्यावे लागेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
ShaniDev: साडेसाती चालू आहे, अडचणींचा वेढा इतक्यात संपणार नाही; या राशीच्या लोकांची होणार दैना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल