शनीच्या कृपेने कर्कसह 3 राशींच्या लोकांचा सुरू होणार 'गोल्डन टाइम', पण 'या' 2 राशींच्या लोकांना राहावं लागणार सावध!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात 'शनिदेव' हे न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानले जातात. शनीची चाल अत्यंत संथ असते आणि जेव्हा ते राशी बदलतात, तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर दीर्घकाळ टिकतो. 2026 हे वर्ष शनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण संपूर्ण वर्षभर शनिदेव गुरुच्या 'मीन' राशीत मुक्कामाला असणार आहेत.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रात 'शनिदेव' हे न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानले जातात. शनीची चाल अत्यंत संथ असते आणि जेव्हा ते राशी बदलतात, तेव्हा त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर दीर्घकाळ टिकतो. 2026 हे वर्ष शनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण संपूर्ण वर्षभर शनिदेव गुरुच्या 'मीन' राशीत मुक्कामाला असणार आहेत. पंचांगानुसार, 29 मार्च 2025 रोजी शनीने कुंभेतून मीन राशीत प्रवेश केला होता आणि 2026 मध्ये ते याच राशीत मार्गी आणि वक्री अवस्थेत राहतील. या स्थितीमुळे काही राशींच्या नशिबाचे द्वार उघडणार आहेत, तर काहींना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
2/7
वृषभ - छप्परफाड कमाई: वृषभ राशीच्या लोकांसाठी 2026 हे वर्ष 'गोल्डन टाइम' ठरेल. शनिदेव तुमच्या राशीच्या 11 व्या स्थानात असल्याने तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होईल. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे.
advertisement
3/7
कर्क - नशिबाची भक्कम साथ: कर्क राशीच्या नवव्या स्थानातून शनीचे भ्रमण होत असल्याने तुमचे भाग्य उजळणार आहे. विशेषतः जे लोक उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्यास इच्छुक आहेत, त्यांचे स्वप्न पूर्ण होईल. समाजात मान-सन्मान वाढेल आणि धार्मिक कार्याकडे तुमचा ओढा वाढेल.
advertisement
4/7
तूळ - शत्रूवर विजय: तूळ राशीच्या सहाव्या भावात शनिदेवाचे वास्तव्य असल्याने तुमचे धाडस वाढेल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. ज्यांना नोकरीत बदल हवा आहे, त्यांना मोठ्या संधी उपलब्ध होतील. आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होतील आणि आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.
advertisement
5/7
धनु - प्रगतीचे नवे मार्ग: धनु राशीसाठी शनीचे संक्रमण जीवनात स्थैर्य घेऊन येईल. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे. नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात आनंद राहील आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल.
advertisement
6/7
सिंह - सिंह राशीवर शनीची 'ढैय्या' सुरू असल्याने तुम्हाला आर्थिक व्यवहारात खूप सावध राहावे लागेल. विनाकारण होणारे खर्च तुमचे बजेट बिघडू शकतात. आरोग्याची तक्रार असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
7/7
मीन - या राशीवर साडेसातीचा 'दुसरा टप्पा' सुरू आहे. शनिदेव स्वतः याच राशीत असल्याने मानसिक तणाव जाणवू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवून मोठे निर्णय घेऊ नका. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
शनीच्या कृपेने कर्कसह 3 राशींच्या लोकांचा सुरू होणार 'गोल्डन टाइम', पण 'या' 2 राशींच्या लोकांना राहावं लागणार सावध!