नेमकं काय कारण ठरलं?
फातिमा तुर्की असे या महिलेचे नाव आहे. ती मालाड पूर्वेकडील एका इमारतीत आपल्या कुटुंबासोबत राहत होती. फातिमा तुर्की या मानसिक तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती आपल्या दोन मुलं आणि एका मुलीसह राहत होती.
सोमवारी सकाळच्या सुमारास तिने अचानक इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. जखमी अवस्थेत तिला तातडीने जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच तातडीनेदिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे.
